IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली; मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली;  मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

25 Nov 2024, 16:17 वाजता

IPL Auction 2025 Live: 'या' खेळाडूंवर लागली आज पहिल्या सेटमध्ये बोली 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्यांदा कोणत्या खेळाडूंवर बोली लावली गेली ते बघा. 

  • जोस इंग्लिस
  • रायन रिकेल्टन 
  • नितीश राणा
  • कृणाल पंड्या 
  • डॅरिल मिशेल
  • मार्को यान्सन
  • सॅम कुरन 
  • वॉशिंग्टन सुंदर
  • शार्दुल ठाकूर 
  • फॉफ डु प्लेसिस
  • मयंक अग्रवाल
  • अजिंक्य रहाणे
  • रोव्हमन पॉवेल
  • पृथ्वी शॉ

25 Nov 2024, 16:01 वाजता

IPL Auction 2025 Live:  कृणाल पांड्यासाठी 'रॉयल' टक्कर

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या यांच्यात चुरशीची लढत झाली. कृणालची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आरसीबीने त्याच्यासाठी सर्वप्रथम बोली लावली होती. यानंतर राजस्थानने आपले पॅडल उंचावले. त्याने 5.50 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. आरसीबीने राजस्थानला मागे टाकले आणि क्रुणालला 5.75 कोटी रुपयांना खरेदी केले. यावेळी मुंबई इंडियन्सने बोलीसुद्धा लावली नाही. 

 

 

25 Nov 2024, 15:54 वाजता

मार्को यानसन पंजाब किंग्जचा भाग झाला

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पंजाब किंग्ज संघात दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनचा समावेश करण्यात आला आहे. त्याला 7 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. यानसनन गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

 

25 Nov 2024, 15:49 वाजता

सॅम करन परतला सीएसकेकडे 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला आहे. CSK ने त्याला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले. पंजाबने सॅम करनसाठी आरटीएम कार्ड वापरले नाही. 

25 Nov 2024, 15:46 वाजता

गुजरातने वॉशिंग्टन सुंदरला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: भारताचा फिरकी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने विकत घेतले. गुजरात संघाने लखनौ सुपर जायंट्सला मागे टाकले आणि सुंदरला 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले.

25 Nov 2024, 15:41 वाजता

अजिंक्य रहाणे, मयंक, शार्दुल ठाकुर आणि पृथ्वी शॉ न अनसोल्ड

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला कोणीही विकत घेतले नाही. मागच्या वेळी तो चेन्नई सुपर किंग्ज संघात होता. मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकुर आणि पृथ्वी शॉ या भारतीय खेळाडूंना कोणीही विकत घेतले नाही. गेल्या वेळी पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आणि मयंक सनरायझर्स हैदराबादच्या संघात होता. 

25 Nov 2024, 15:34 वाजता

लिलाव होणार लवकरच सुरू 

आयपीएल मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. काही वेळात खेळाडूंवर बोली सुरू होईल. आजही अनेक स्टार खेळाडूंवर फ्रँचायझी नजर ठेवून आहेत. आरसीबीसारख्या संघाला अजूनही अनेक खेळाडूंची गरज आहे. अशा स्थितीत आजही लिलाव प्रक्रिया अत्यंत रोमांचक होणार आहे.

25 Nov 2024, 15:19 वाजता

थोड्याच वेळात सुरु होणार मेगा लिलाव फ्रीमध्ये कुठे बघता येईल? 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: बीसीसीआय आयपीएल मेगा ऑक्शन 2025 च्या दुसऱ्या दिवसाचे काम सुरु झाले आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनचं लाईव्ह टेलिकास्ट हे दुपारी 3: 30 वाजल्यापासून टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल, तर जिओ सिनेमा अँप आणि वेबसाईटवर ऑक्शनचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येईल. 

25 Nov 2024, 15:01 वाजता

थोड्याच वेळात सुरु होईल लिलावाचा दुसरा दिवस... 10 संघांना आज खरेदी करणार 132 खेळाडू 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  दुसऱ्या दिवशी फाफ डु प्लेसिस, ग्लेन फिलिप्स, सॅम कुरन, केन विल्यमसन, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लॉकी फर्ग्युसन, टीम डेव्हिड, विल जॅक, नवीन उल हक, स्टीव्ह स्मिथ, नितीश राणा आणि अजिंक्य रहाणे यांसारखे मोठे खेळाडू लिलावात उतरतील.

 

 

25 Nov 2024, 14:27 वाजता

रिटेन न केल्याने लिलावात पृथ्वी शॉचे काय होणार?

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: 2018 मध्ये आपल्या आयपीएल कारकीर्दीला सुरुवात करणारा पृथ्वी शॉ पहिल्या सत्रापासून दिल्ली फ्रँचायझीसाठी खेळत आहे. पण यावेळी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवलेले नाही. शॉचा अलीकडचा फॉर्म चांगला नाही आणि त्यामुळे कोणती फ्रेंचायझी त्याच्यावर बोली लावते हे पाहणे बाकी आहे.