IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली; मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली;  मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

25 Nov 2024, 17:51 वाजता

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: स्वस्तिक चित्रा विकला गेला नाही

25 Nov 2024, 17:07 वाजता

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: कोणत्या संघाकडे आता किती पर्स शिल्लक आहेत?

RCB- 14.15 कोटी
CSK- 13.2 कोटी
GT - 11.9 कोटी
MI - 11.05 कोटी
PBKS - 10.9 कोटी
KKR - 8.55 कोटी
LSG - 6.85 कोटी
आरआर - 6.65 कोटी
SRH - 5.15 कोटी
DC - 3.80 कोटी

25 Nov 2024, 17:01 वाजता

IPL Auction 2025 Live: शाई होप, आदिल रशीद आणि केशव महाराज राहिले अनसोल्ड

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: वेस्ट इंडिजचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज शाई होपला कोणीही विकत घेतले नाही. याशिवाय इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीदवर कोणीही बोली लावली नाही. दक्षिण आफ्रिकेचा महान फिरकी गोलंदाज केशव महाराजही विकला गेला नाही.

 

25 Nov 2024, 16:58 वाजता

IPL Auction 2025 Live: अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्सने विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाताने 4.60 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, पण शेवटी मुंबईने बाजी मारली. 

 

 

25 Nov 2024, 16:47 वाजता

IPL Auction 2025 Live: आकाश दीपला लखनौने तर फर्ग्युसनला विकत घेतले पंजाबने 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  आकाश दीपने लखनऊ सुपर जायंट्सने 8 कोटी रुपयांना खरेदी केले. ऑस्ट्रेलियाला गेलेल्या भारतीय कसोटी संघात आकाशचा समावेश आहे. अलीकडच्या काळात त्याने शानदार गोलंदाजी केली आहे. आकाश गेल्या वेळी आरसीबीचा सदस्य होता. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किमतीला 2 कोटी रुपयांना विकत घेतले.

 

 

25 Nov 2024, 16:41 वाजता

 IPL Auction 2025 Live: भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरला घेतले मुंबई इंडियन्स

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर या वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईने त्याला 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले.  चेन्नई सुपर किंग्जनेही त्याच्यावर बोली लावली. परंतु मुंबई संघाने दीपक चहरला 9.25 कोटी रुपयांना विकत घेत चेन्नईचा पराभव केला.

 

25 Nov 2024, 16:32 वाजता

IPL Auction 2025 Live: भुवनेश्वरला मिळाले 10.75 कोटी 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा महान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात चुरशीची बोली लागली होती. दोघेही आक्रमकपणे बोली लावत होते. मुंबईने 10.25 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. लखनौने 10.50 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. आरसीबीने 10.75 कोटींची फक्त एकच बोली लावली आणि भुवनेश्वरला विकत घेतले. तो दुसऱ्या दिवसाचा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

 

 

25 Nov 2024, 16:30 वाजता

IPL Auction 2025 Live: राजस्थानने नितीश राणाला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  कोलकाता नाईट रायडर्सचा माजी फलंदाज नितीश राणा यांच्यासाठी अनेक संघांमध्ये चुरशीची लढत झाली. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यासाठी पहिली बोली लावली. आरसीबीने त्याला स्पर्धा दिली.

25 Nov 2024, 16:25 वाजता

IPL Auction 2025 Live: चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले तुषारला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  तुषार देशपांडेसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली आहे. अखेर राजस्थान रॉयल्सने तुषार देशपांडेला 6.5 कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमात तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता.

 

 

25 Nov 2024, 16:22 वाजता

IPL Auction 2025 Live: आता 'या' खेळाडूंवर लागणार बोली 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  
 1. दीपक चाहर

2. जेराल्ड कोएत्जी

3. आकाश दीप

4. तुषार देशपांडे

5. लौकी फर्ग्यूसन

6. भुवनेश्वर कुमार

7. मुकेश कुमार