MI vs RR Live score : राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव

MI vs RR Live Score, IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडेवर 14 वा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.   

MI vs RR Live score : राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव

MI vs RR Live Score in Marathi : पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पहायला लागल्यानंतर आता मुंबई होम ग्राऊंडवर कशी कामगिरी करेल यावर सर्वांचं लक्ष लागलंय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच वानखेडेवर खेळणार आहे. त्यामुळे आता हार्दिक संघाला विजयाचा श्रीगणेशा करणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माच्या कामगिरीवर लक्ष असेल. त्याचबरोबर राजस्थानकडून यशस्वी मुंबईच्या मैदानात कशी कामगिरी करेल? हे देखील पाहण्याजोगं असेल.

1 Apr 2024, 23:54 वाजता

आयपीएलच्या 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत पहिला विजय मिळवता आलेला नाही आणि ती 10व्या स्थानावर आहे.

1 Apr 2024, 22:03 वाजता

MI vs RR Live score
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्ससमोर 126 धावांचं आव्हान ठेवलं आहे. याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का बसला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 12 धावांवर बाद झाला. मधवालने त्याची विकेट घेतली. त्याधी सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल केवळ 10 धावा करुन बाद झाला

1 Apr 2024, 21:20 वाजता

Mumbai Indians Innings

राजस्थानने फलंदाजीचं दिलेलं आव्हान स्विकारून फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सला चांगली सुरूवात करता आली नाही. मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा, नमन धीर आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिस या तिघांना ट्रेंड बोल्डने भोपळा देखील फोडून दिला नाही. त्यामुळे 14 वर 3 आऊट अशी परिस्थिती मुंबई इंडियन्सची झाली होती. इशान किशनने हात उघडले पण नांद्रे बर्गरने इशानला बाहेरचा रस्ता दाखवला. तिलक वर्मा आणि कॅप्टन हार्दिक पांड्याने मैदानावर पाय रोवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना म्हणावी तशी आक्रमता दाखवता आली नाही. तिलकने 29 बॉलमध्ये 32 धावा केल्या. तर पांड्याने 21 बॉलमध्ये 34 धावांची मुंबईकडून सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर मुंबईच्या शेपटाने चोरट्या धावा घेत मुंबई इंडियन्सला 125 धावांवर पोहोचवलं. 

1 Apr 2024, 21:11 वाजता

मुंबईची फलंदाजी ढेपाळल्यानंतर आता टीम डेव्हिडच्या खांद्यावर पलटणची जबाबदारी आहे. जेराल्ड कोएत्झी 4 धावा करून बाद झाल्यानंतर आता बुमराह फलंदाजीला आला आहे.

1 Apr 2024, 20:59 वाजता

मुंबई संकटात असताना तिलक वर्माने संयमी खेळी केली. हार्दिकला साथ दिल्यानंतर आता तिलक 32 धावा करून बाद झालाय. 

1 Apr 2024, 20:36 वाजता

मुंबईचा अँकर बॅट्समन म्हणून मैदानात आलेला पियूष चावला 3 धावा करून बाद झाला. आवेश खानने त्याला तंबूत पाठवलं. त्यामुळे आता मुंबईला 6 वा धक्का बसला आहे.

1 Apr 2024, 20:29 वाजता

खराब सुरूवात झाल्यानंतर मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याने 21 बॉलमध्ये 34 धावांची खेळी केली. युझी चहलने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. मुंबई इंडियन्सने 10 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या आहेत.

1 Apr 2024, 19:55 वाजता

मुंबई इंडियन्सला चौथा धक्का बसला आहे. सलामीवीर इशान किशन 16 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्गरने इशानला तंबूत पाठवून पलटणला बॅकफूटवर पाठवलंय.

1 Apr 2024, 19:50 वाजता

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेला डेवाल्ड ब्रेव्हिस शुन्यावर बाद झाला. मुंबईची पहिले तिन्ही खेळाडू पहिल्याच बॉलवर बाद झालेत.

1 Apr 2024, 19:37 वाजता

मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली असून सलामीवीर रोहित शर्मा केवळ 1 धाव करून बाद झाला. तर नमन धीर देखील पुढच्याच बॉलवर एलबीडब्ल्यू झाल्याने पहिल्या ओव्हरमध्ये मुंबईला दोन गडी गमवावे लागले. ट्रेंड बोल्डने आक्रमक सुरूवात करून दिली.