RCB vs CSK: चेन्नईच्या आव्हानासमोर आरसीबीने टाकली नांगी; थरारक सामन्यात CSK चा दमदार विजय!

RCB vs CSK, IPL 2023 : आयपीएल (IPL 2023) हंमागातील सर्वात रोमांचक सामना आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नईने बंगळुरूच्या विराटसेनेवर विजय मिळवला आहे.

RCB vs CSK: चेन्नईच्या आव्हानासमोर आरसीबीने टाकली नांगी; थरारक सामन्यात CSK चा दमदार विजय!

IPL 2023 RCB vs CSK LIVE: आयपीएलचा 24 वा सामना आयपीएलच्या दोन सर्वात लोकप्रिय संघांमध्ये खेळला गेला. एका बाजूला चेन्नई सुपर किंग्ज आणि दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ. सामना एवढा रंगला की, उत्सुकता वेगळ्याच थरावर गेली होती. अखेरच्या ओव्हरवर 19 धावांवर असताना माथेशा पाथीराणा (Matheesha Pathirana) याने शानदार ओव्हर केली आणि सामना चेन्नईच्या पारड्यात गेला.

17 Apr 2023, 20:19 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईला दुसरा मोठा धक्का, अजिंक्य रहाणे बाद, वहिनंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 Apr 2023, 19:58 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईची पॉवरप्लेमध्ये 53 धावांची खेळी, 1 विकेटचं नुकसान 

17 Apr 2023, 19:53 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score: 5 ओव्हरमध्ये चेन्नईची 38 धावांची खेळी, गमावली 1 विकेट 

17 Apr 2023, 19:42 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 Apr 2023, 19:31 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score: चेन्नईच्या फलंदाजीला सुरवात, ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे क्रिझवर, बंगळुरूकडून मोहम्मद सिराज करणार पहिली गोलंदाजी 

 

17 Apr 2023, 19:12 वाजता

दोन्ही टीम्सची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, शिवम दुबे,महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), तुषार देशपांडे, महिश थिकशाना,मथीशा पथिराना

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : एफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, वहिनंदू हसरंगा, शाहबाज अहमद, डब्ल्यूडी पारनेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाख