कुस्तीपटूचं स्वप्न जीवावर बेतलं; चितपट करण्याच्या नादात गेला जीव, पाहा व्हिडीओ

चितपट करताना मान मोडली... कुस्तीपटूचा मृत्यू, पाहा व्हिडीओ

Updated: Sep 9, 2021, 03:41 PM IST
कुस्तीपटूचं स्वप्न जीवावर बेतलं; चितपट करण्याच्या नादात गेला जीव, पाहा व्हिडीओ title=

मुरादाबाद: भारतात कुस्ती किंवा बॉक्सिंग लोकप्रिय आहे. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात आखाड्यातील कुस्ती खेळली जाते. कुस्ती आखाड्यामध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्या खेळाडूंनी पदक मिळवले आहेत. काहीवेळा ही कुस्ती खेळाडूंच्या जीवावरही बेतू शकते. 

कुस्तीपटूचं स्वप्न एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मोठी खऴबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आखाड्यात कुस्तीचा डाव रंगला आहे. या कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धी कुस्ती खेळताना तरुणाची मान पकडून झटका देतो आणि या तरुणाचा मृत्यू होतो. 

आखाड्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. चितपट करण्याच्या नादात कुस्तीपटूची मान मोडली आणि त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आखाड्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ झीच्या हाती देखील आला आहे. 

ही धक्कादायाक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्पर्धकांमध्येही काहीसं भीतीचं वातावरण आहे. मृत पैलवान उत्तराखंड इथे राहणारा आहे. एक मिनिटाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रतिस्पर्धी कुस्तीपटूवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. ही घटना घडली तेव्हा तिथे कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते.