Mahatama Gandhi jayanti: 'या' स्टार खेळाडूचं महात्मा गांधी यांच्याशी खास कनेक्शन, जाणून घ्या

कोण आहे हा स्टार खेळाडू ? कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करतो? महात्मा गांधी यांच्याशी त्याच कनेक्शन काय?

Updated: Oct 2, 2022, 04:32 PM IST
Mahatama Gandhi jayanti: 'या' स्टार खेळाडूचं महात्मा गांधी यांच्याशी खास कनेक्शन, जाणून घ्या  title=

मुंबई : जगभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatama Gandhi jayanti) यांची जयंती साजरी केली जात आहे. या जयंतीनिमित्त महात्मा गांधी (Mahatama Gandhi) यांच्या संदर्भातले अनेक किस्से समोर येत आहेत. त्यात आता एक किस्सा खेळाच्या मैदानाशी जोडला गेलेला आहे. यामध्ये महात्मा गांधी यांचे एका स्टार खेळाडूशी खास कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. हा खेळाडू कोण आहे ? व त्याचे महात्मा गांधी यांच्याशी काय खास कनेक्शन आहे, ते जाणून घेऊयात.  

'हा' खेळाडू ब्राझीलच्या क्लबकडून खेळतो
ब्राझीलच्या 24 वर्षीय स्टार फुटबॉलपटूचं नाव महात्मा गांधी (Mahatama Gandhi) आहे. हा फुटबॉलपटू ब्राझीलच्या प्रसिद्ध क्लब ऍटलेटिको क्लब गुयानीजसाठी फुटबॉल खेळतो. तो एक मिडफिल्डर आहे. या फुटबॉलपटूने आतापर्यंत आपल्या संघासाठी अनेक महत्वपुर्ण योगदान दिले आहे. 

म्हणून महात्मा गांधी यांच नाव ठेवलं 
स्टार फुटबॉलपटूच्या कुटूंबावर मोठ्या प्रमाणात महात्मा गांधी (Mahatama Gandhi) यांचा प्रभाव आहे. म्हणूनच त्याच्या कुटूंबियांनी त्याचं नाव महात्मा गांधी ठेवले होते. स्टार फुटबॉलपटू 2011 मध्ये ब्राझीलच्या प्रसिद्ध क्लब ऍटलेटिको क्लबशी जोडला गेला होता आणि तेव्हापासून तो त्याच्या नावामुळे खूप चर्चेत आहे. मात्र, आजतागायत त्याचे नाव खेळात फार मोठे झालेले नाही आणि त्याला कोणत्याही मोठ्या क्लबकडून खेळण्याची संधीही मिळालेली नाही.

ब्राझीलची विशेष परंपरा
ब्राझीलसह अनेक आफ्रिकन देशांमध्ये लोक मुलांची नावे सेलिब्रिटींच्या नावावर ठेवतात. कधीकधी लोक त्यांच्या आवडत्या शिक्षकाचे किंवा एखाद्या प्रसिद्ध कलाकाराचे देखील नाव ठेवतात. दरम्यान अनेक फुटबॉलपटू ब्राझीलमधील वेगवेगळ्या क्लबमधूनही खेळतात, ज्यांची नावे प्रसिद्ध व्यक्तींवर आहेत. पोकेमॉन नावाचा खेळाडू अ‍ॅटलेटिको क्लब गयानीजकडूनही खेळतो. या क्लबमध्ये जॉन लिनेन नावाचा खेळाडूही आहे.याचप्रमाणे महात्मा गांधी नावाचा ब्राझीलमध्ये फुटबॉलपट्टू आहे. 

महात्मा गांधी (Mahatama Gandhi) यांच्या आज जयत्तीनिमित्त हा स्टार फुटबॉलपट्टू चर्चेत आला आहे.