महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर होतंय व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?

MS Dhoni Appointment Letter: टीम इंडियामधून खेळण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला होता. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 26, 2024, 03:12 PM IST
महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर होतंय व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?  title=
MS Dhoni appointment letter

MS Dhoni Appointment Letter: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी टीम इंडियासाठी खेळत नसला तरी लाखो चाहते त्याची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात. 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमधून खेळतो. कॅप्टन कूल धोनीची कहामी लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीतून तरुण काही ना काही शिकत असतात. 

टीम इंडियामधून खेळण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला होता. रेल्वेतील त्याच्या पहिल्या नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका यूजरने धोनीच्या अपॉइंटमेंट लेटरचा फोटो शेअर केलाय. बाकी सर्व इतिहास आहे...! अशी कमेंट त्यावर केलीय. तर दुसऱ्याने अद्भुत अशी कमेंट केलीय. भारत-इंग्लंड दरम्यान झालेल्या तिसऱ्या टेस्ट दरम्यान टीव्हीवर   हे अपॉइंटमेंट लेटर दाखवण्यात आले होते. 

अपॉइंटमेंट लेटर ट्वीटरवर

अपॉइंटमेंट लेटरचा हा फोटो मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटर म्हणजेच आताच्या एक्सवर मोहम्मद वोहरा नावाच्या हॅंडलवरुन पोस्ट करण्यात आलंय. एमएस धोनीचे पहिले अपॉइंटमेंट लेटर असे यावर लिहिलंय. ही पोस्ट अपलोड झाल्यानंतर आतापर्यंत त्याला दीड लाखांच्या वर व्ह्यूज आणि 4 लाखांवर कमेंट्स गेल्यायत. 

तिकिट कलेक्टर म्हणून नोकरी 

महेंद्रसिंग धोनी खडगपूरमध्ये तिकिट कलेक्टर म्हणून नोकरी करत असे. पण क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने ही नोकरी सोडली होती. महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीवर एक सिनेमा आला होता. सुशांतसिंग राजपूत याने या सिनेमात धोनीची भूमिका केली होती. त्यातून धोनीच्या चाहत्यांना धोनीच्या स्ट्रगलबद्दल खूप माहिती मिळाली. 

यशस्वी कॅप्टन

महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये क्रिकेटमधून रिटार्टमेंट घेतली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना तो दिसतो. यावेळी 22 मार्च 2024 रोजी आयपीएल सुरु होणार आहे. थलायवाला ग्राऊंडवर खेळताना पाहण्यासाठी त्याचे फॅन्स आतूर झाले आहेत. धोनी हा जगभरातील यशस्वी कप्तांनांमध्ये गणला जातो. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय क्रिकेट तिन्ही फॉर्मेटमध्ये चॅम्पियन ठरला होता. या काळात टी 20 वर्ल्ड कप, वर्ल्ड कप 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चे विजेतेपद भारताकडे आले. महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टिमने टेस्टमध्ये नंबर एक होण्याचा मान मिळवला होता.