धोनीचा गाणं म्हणतानाचा हा व्हिडिओ बघितलात का?

धोनी ५ महिने क्रिकेटपासून लांब

Updated: Dec 5, 2019, 01:04 PM IST
धोनीचा गाणं म्हणतानाचा हा व्हिडिओ बघितलात का?

मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी जवळपास ५ महिने क्रिकेटपासून लांब आहे. क्रिकेट खेळत नसला तरी धोनीची चर्चा मात्र कायम आहे. कधी लष्कराची सेवा करण्यासाठी जम्मू-काश्मीरला गेल्यामुळे, तर कधी दुसरे खेळ खेळल्यामुळे धोनी चर्चेत असतो. धोनीच्या निवृत्तीचे प्रश्नही वारंवार उपस्थित होत आहे. पण या सगळ्यात धोनी त्याचं वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. धोनीचा गाणं म्हणतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

धोनीच्या एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी 'जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए..' हे गाणं म्हणत आहे. जुर्म चित्रपटाचं हे गाणं कुमार सानूने म्हणलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

WARNING: PLS WATCH AT UR OWN RISK... The very talented Mr Mahi ... @mahi7781 pls dont kill me for postin dis one !!! But dis awaaz had to b shared !!@sakshisingh_r urs comin soon ! Duet singer : @anubhavdewan_ wah wah wah !!! Audience : me n #monusingh Thank god @sambhavdewan ur dad came to de rescue... Thanksss @__refulgence for an amazing night !!

A post shared by Preeti Simoes (@preeti_simoes) on

धोनीने यावर्षी जुलै महिन्यात धोनीने शेवटची मॅच खेळली होती. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचनंतर धोनी मैदानात दिसला नाही. यानंतर भारतीय टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशची टीमही भारत दौऱ्यावर आली. आता वेस्ट इंडिजची टीम भारत दौऱ्यावर टी-२० आणि वनडे सीरिज खेळणार आहे, पण या सगळ्या सीरिजमध्ये धोनी खेळला नाही.

रांचीच्या स्टेडियममध्ये धोनी सराव करताना दिसला होता. जानेवारी २०२० पर्यंत माझ्या कारकिर्दीबाबत काहीही विचारू नका, असं धोनी म्हणाला होता. धोनीचं भवितव्य आता आयपीएलमधल्या कामगिरीवर अवलंबून आहे. धोनी हा आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतो. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीच्या आयपीएलमधल्या फॉर्मवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असं वक्तव्य केलं होतं.