IND vs NZ 1st T20: कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतीच भारत आणि न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात खेळली गेलेली वनडे मालिका जिंकली. मालिका नुसती जिंकली नाही तर वनडे रँकिंगमध्ये (One Day Ranking) संघाने अव्वल स्थान प्राप्त केलंय. अशातच आता टीम इंडियाचं लक्ष टी-ट्वेंटी मालिकेकडे (IND vs NZ) असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारी रोजी रांचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेसाठी टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर असणार आहे. अशातच आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. (Mahendra Singh Dhoni visiting at training session in Ranchi before ind vs nz 1st t20 Dressing Rooms Video)
पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय. त्यावेळी राँचीचा लोकल बॉय आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंह धोनी टीमसोबत गप्पा मारताना दिसतोय. धोनीच्या स्वागतासाठी स्वत: कॅप्टन पांड्या हजर झाला. त्यावेळ इशान किशन, पांड्या यांच्यात जोरदार चर्चा होताना दिसते. पांड्या काहीसा आक्रमक दिसतो. त्यामुळे धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Rooms Video) राडा?, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित होताना दिसतोय.
Look who came visiting at training today in Ranchi - the great @msdhoni! #TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
दरम्यान, युझी चहलसह टीमचे अनेक खेळाडूंनी धोनी आल्याचं कळताच त्याच्याभोवती गराडा घातला. त्यावेळी धोनीने (MS Dhoni) सल्ले देखील दिले आहेत. त्यामुळे आता हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलंय. टी-ट्वेंटी मालिकेत भारताची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.