IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का

IND vs NZ T20 :टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. 

Updated: Jan 26, 2023, 07:01 PM IST
IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड  एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का  title=

IND vs NZ T20 : टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी एक घोळ झाला आहे. तो म्हणजे उद्या टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन टी20 सामने खेळणार आहे. त्यामुळे फॅन्सना प्रश्न पडलाय की, एकाच दिवशी दोन्ही संघ दोन टी20 सामने कसे खेळणार आहेत. 

दोन टी20 सामने कसे? 

खरं तर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा (India vs New Zealand) पुरुष संघ 27 जानेवारीला T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहे. दुसरीकडे, 27 जानेवारी रोजी, T20 वर्ल्ड कप 2023 चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड अंडर-19 महिला संघांमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळेच एकाच दिवशी टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये दोन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. 

अंडर 19 टीम इंडियाच्या (Team india)महिला संघाला सुपर सिक्स फेरीत ऑस्ट्रेलियाने केवळ 87 धावांवर ऑल आऊट केले होते. मात्र पुढच्या सामन्यात भारताने पुनरागमन करत श्रीलंकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला. आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. आता टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंडविरूद्ध असणार आहे. 

तर उद्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे.

सामन्याचा वेळ काय?

भारत महिला अंडर-19 विरुद्ध न्यूझीलंड महिला अंडर-19 T20 वर्ल्ड कप उपांत्य फेरीचा सामना सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल. या सामन्याला दुपारी दीड वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पुरुष संघांमधील T20 मालिकेतील पहिला सामना JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम रांची येथे होणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 

दरम्यान या दोन्ही सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. कारण एकीकडे टीम इंडियाचा अंडर 19 संघ वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट खेळतोय. तर गेल्या अनेक मालिकेत हार्दीक पंड्या टीम इंडियाच्या टी20 संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळतोय. ही जबाबदारी तो चोख बजावतोय. आता न्यूझीलंड विरूद्ध तो कशी कामगिरी करतो हे पाहावे लागणार आहे.