Suresh Raina On Shahid Afridi: महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) निवृत्ती जाहीर केल्यानंतर टीम इंडियाचा माजी बॅट्समन सुरैश रैनाने (Suresh Raina) लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली. सध्या सुरेश रैना कतारमध्ये सुरू असलेल्या लीजेंड्स लीग खेळताना दिसत आहे. इंडिया महाराजाकडून (India Maharajas) खेळताना रैनाने पुन्हा रुद्रावतार दाखवला. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्याने पाकिस्तानचा माजी स्टार खेळाडू बुम बुम अफ्रिदी म्हणजे शाहिद अफ्रिदीची (Shahid Afridi) खिल्ली उडवली आहे.
सुरेश रैनाच्या आक्रमक खेळीमुळे तो पुन्हा टीम इंडियात येण्याची तयारी करतोय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर त्याला पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिलं. "मैं सुरेश रैना हूं, शाहिद अफरीदी नहीं", असं उत्तर त्याने (Suresh Raina On Shahid Afridi) दिलंय.
आणखी वाचा - Suresh Raina: अचानक निवृत्ती का घेतली? फक्त 30 मिनिटात असं काय झालं? रैना म्हणतो...
शाहिद अफ्रिदीने अनेकदा इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची (Shahid Afridi Retirement) घोषणा केली आहे आणि त्यानंतर तो पुन्हा पाकिस्तानच्या संघात परतला आहे. त्यामुळे रैनाने भर पत्रकार परिषदेत (Press Conference) अफ्रिदीची खिल्ली उडवत निशाणा साधला आहे.
Suresh Raina with a hilarious comment there. Loved it, and I'm sure Shahid Afridi would love it too #LegendsLeagueCricket pic.twitter.com/ZnVUMBXkCq
— Farid Khan (@_FaridKhan) March 15, 2023
दरम्यान, गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली खेळत असलेल्या इंडिया महाराजाने वर्ल्ड जायन्ट्सचा तीन गडी राखून धुव्वा उडवला. त्यात सुरेश रैनाची 49 धावांची खेळी मोलाची ठरली. दरम्यान, सुरेश रैनाने शाहिद आफ्रिदीला वाईटरित्या ट्रोल करण्यात आले, ज्याची इंटरनेटच्या जगात वेगाने चर्चा होत आहे.
मिस्टर आयपीएल सुरेश रैना कमबॅक करणार आहे. रैना आयपीएल 2023 मध्ये पुन्हा एकदा दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यावेळी तो खेळाडूच्या रूपात नाही तर रैना जियो सिनेमा (Jio Cinema) साठी एक्स्पर्ट म्हणून दिसून येण्याची शक्यता आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.