ऋषभ पंतच्या खांद्यावर तो हात कोणाचा होता? अखेर 4 वर्षांनंतर मयंक अग्रवालकडून रहस्याचा खुलासा

Mayank Agarwal : 2019 साली वर्ल्डकपच्या दरम्यानचा हा फोटो आहे. यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात हा प्रश्न होता की, फोटोमध्ये ऋषभ पंतच्या डाव्या खांद्यावर असलेला हात नेमका कोणाचा आहे?

सुरभि जगदीश | Updated: Sep 29, 2023, 08:59 AM IST
ऋषभ पंतच्या खांद्यावर तो हात कोणाचा होता? अखेर 4 वर्षांनंतर मयंक अग्रवालकडून रहस्याचा खुलासा title=

Mayank Agarwal : आज टीम इंडियाचे अनेक चाहते फार खूश आहेत. याचं कारण म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून चाहत्यांच्या मनात असलेल्या रहस्याचा त्याने उलगडा केला आहे. झालं असं की, 2019 साली टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी एक फोटो काढला होता. या फोटोमध्ये ऋषभ पंत ( Rishabh Pant ), हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ), जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) , मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal ) आणि महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) होते. दरम्यान या फोटोमध्ये ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात आहे, हे इतके वर्ष कोणाला माहिती नव्हतं आणि कोणाला ते समजलंही नव्हतं. अखेरीस वर्षांनंतर मयांक अग्रवालने या रहस्याचा खुलासा केला आहे. 

2019 साली वर्ल्डकपच्या दरम्यानचा हा फोटो आहे. यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात हा प्रश्न होता की, फोटोमध्ये ऋषभ पंतच्या डाव्या खांद्यावर असलेला हात नेमका कोणाचा आहे?

पंतच्या खांद्यावर तो हात कोणाचा, सगळेच संभ्रमात

पंड्याने हा फोटो पोस्ट केल्यानंतर, त्यात असलेल्या खेळाडूंमुळे नाही तर पंतच्या खांद्यावर ठेवलेल्या रहस्यमयी व्यक्तीच्या हातामुळे हा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी पंतच्या खांद्यावर कोणी हात ठेवला याचं चाहत्यांना आश्चर्य वाटलं होतं. काही चाहत्यांनी अंदाज लावला होता की, हा मयंकचा ( Mayank Agarwal ) हात असू शकतो. मात्र एकंदरीत हा फोटो पाहिलात तर मयंत पंतपासून बराच दूर उभा होता, त्यामुळे हा हात त्याचा नसावा असाही काही लोकांचा समज होता. यावेळी बुमराहचे ( Jasprit Bumrah ) दोन्ही हात धोनीच्या खांद्यावर होते. तर मयंक ( Mayank Agarwal ) बुमराहच्या अगदी मागे उभा होता.

मयांकने उलगडलं रहस्य

अखेरीस 4 वर्षांनी मयांक अग्रवालने ( Mayank Agarwal ) या रहस्याचा खुलासा केला आहे. याबाबत मयंक अग्रवालने ट्विट केलं असून तो म्हणतो, बरेच वर्षे शोध घेतल्यानंतर, चर्चा आणि थिअरी मांडल्यानंतर मी देशाला यामागचं खरं सत्य सांगणार आहे. हा हात माझा असून मीच ऋषभ पंतच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोबाबत ज्या अफवा उडाल्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत.

2019 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडली होती. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. यानंतर त्याने वर्षभराने निवृत्ती जाहीर केली. दरम्यान या फोटोबाबत मयंक अग्रवालने ( Mayank Agarwal ) खुलासा केल्याने अनेक चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.