IPL 2022: अय्यर ना के एल राहुल... हा दिग्गज होऊ शकतो अहमदाबाद संघाचा कर्णधार

खरंच ठरलं? ना अय्यर ना राहुल, हा दिग्गज भारतीय अहमदाबादचा होणार कर्णधार?

Updated: Jan 10, 2022, 07:30 PM IST
IPL 2022: अय्यर ना के एल राहुल... हा दिग्गज होऊ शकतो अहमदाबाद संघाचा कर्णधार title=

मुंबई: आयपीएल 15 वा सीझनवर कोरोनाचं सावट आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत. अहमदाबाद, लखनऊ आणि आता कोहलीनं कर्णधारपद सोडल्याने RCB या तिन्ही संघाचे कर्णधार कोण? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

अहमदाबाद संघाचा कर्णधार के एल राहुल, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर पैकी कोणी एक होऊ शकतो अशी चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान एक ट्वीस्ट देणारी बातमी येत आहे. अहमदाबाद संघाबाबत एक मोठी अपडेट येत आहे. 

कर्णधारपदाच्या रेसमध्ये आता ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याचा नावाचा समावेश झाला आहे. अहमदाबाद संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

IPL 2022 | कोरोनामुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सर्व सामने महाराष्ट्रात?

फिटनेसमुळे हार्दिक पांड्या आधीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर त्याच्या फिटनेसमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकलं नाही. तो पुन्हा संघात परतेल की नाही याबाबत सध्या तरी शंका आहे. 

यावेळी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये रिटेन केलं नाही. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात हार्दिक आपली विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे मुंबईने त्याला रिटेन केलं नाही अशी चर्चा आहे. फ्रँचायझींकडे मर्यादित खेळाडूंनाच कायम ठेवण्याचा पर्याय होता. 

या सगळ्या परिस्थितीमध्ये जर हार्दिक पांड्याला अहमदाबादचे कर्णधारपद मिळाले तर तो त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट असेल. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे आता मॅनेजमेंट नेमकं काय घोषणा करणार कोणाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Ind vs SA 3rd Test:काय आहे टीम इंडियाची रणनिती, विराटच्या खेळण्यावरही मोठी अपडेट

वाढत्या कोरोनामुळे कदाचित महाराष्ट्रात IPL 2022 चे सामने होण्याची शक्यता आहे. तर आयपीएलच्या मेगा ऑक्शनवरही कोरोनाचं सावट आहे. याबाबतही येत्या काळात मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.