IPL Retention 2023 Mumbai Indians: पुढल्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी (IPL Retention 2023) येत्या 23 डिसेंबरला आयपीएलचा मिनी लिलाव (IPL Auction) होणार आहे. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. आज सर्व संघांनी बीसीसआयकडे रिलीज खेळाडूंची यादी (ipl 2023 retained players list) पाठवली. त्यानंतर आता नावांची घोषणा सर्वच संघांनी केली आहे.
पाच वेळा आयपीएलचा कप जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदा तब्बल 13 खेळाडूंना नारळ दिला आहे. वेस्ट इंडिजचा आणि मुंबई इंडियन्सने अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) आयपीएलमधून (IPL) निवृत्ती घेतली. त्यामुळे मुंबईने पोलार्डला रिलीज केलंय हे पक्क झालं होतं. त्यानंतर आता आणखी 12 खेळाडूंची नावं समोर आली आहे. (MI retained players 2023 Full list of players retained by Mumbai Indians ahead of IPL Auction)
आणखी वाचा - IPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!
कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंह, आर्यन जुयाल, बेसिल थंपी, डॉनियल सॅम्स, फॅबिएन ऐलन, जयदेव उनादकट, मयंक मर्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धि, राइली मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स.
दरम्यान, संघाची ताकद असलेला कायरन पोलार्ड (Kieron Pollard) मुंबई संघासोबतच (Mumbai Indians) असणार आहे. तर टायमल मिल्स आणि जयदेव उनादकट या दोन खेळाडूंना डच्चू दिल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर डॉनियल सॅम्स याच्या नावाची देखील अनेकांनी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे यंदा रोहितसेना पुन्हा आयपीएलची ट्रॉफी उचलणार का?, असा सवाल मुंबईच्या चाहत्यांना पडला आहे.