मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) शुक्रवारी (20 मे) राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नईवर (CSK) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेत प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं. राजस्थान यासह प्लेऑफमध्ये धडक देणारी तिसरी टीम ठरली. याआधी गुजरात आणि लखनऊने धडक मारली. (mi vs dc ipl 2022 mumbai indians vs delhi capitals decider match dc or rcb which will 4th team who qualified to playoffs)
आता उर्वरित एका जागेसाठी दिल्ली आणि आरसीबीसाठी 2 संघात कडवी झुंज असणार आहे. विशेष म्हणजे या 2 संघांचं भवितव्य हे मोसमातून बाहेर पडलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) ठरवणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज (21 मे) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफची चौथी टीमही ठरणार आहे.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात दिल्ली जिंकल्यास ती प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरेल. तसेच मुंबईचा विजय झाल्यास आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे खुले होतील. एकूणच आजच्या सामन्यानंतर प्लेऑफचे चारही संघ निश्चित होतील.
या मोसमात मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांना आतापर्यंत सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला पदार्पणाची संधी केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागून राहिलं होतं. अर्जुनला 13 साखळी सामन्यांमध्ये काही संधी मिळाली नाही.
त्यामुळे आता मुंबईच्या या मोसमातील शेवटच्या साखळी सामन्यात अर्जुनला डेब्यूची संधी मिळू शकते, असं म्हटलं जात आहे. यामुळे मुंबई विरुद्ध दिल्ली या सामन्यासह अर्जुनला संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.