पुणे : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्माने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात 25वी धावा घेताच, तो T20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला. रोहित शर्मापूर्वी विराट कोहलीने भारतासाठी ही कामगिरी केली होती. अशाप्रकारे रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या 10 हजार धावांमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील धावांचाही समावेश आहे. (mi vs pbks ipl 2022 mumbai indians captain rohit sharma become 2nd indians and overall 7 th batsman who complete 10 thousand runs in t20 cricket)
या सामन्यापूर्वी रोहितने टी-20 फॉरमॅटमध्ये 9 हजार 975 धावा केल्या होत्या. पंजाबविरुद्धच्या चौथ्या षटकात कागिसो रबाडाच्या तिसऱ्या चेंडूवर हिटमॅन रोहितने सिक्स खेचला. यासह रोहित टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा एकूण सातवा फलंदाज ठरला. भारतासाठी फक्त विराट कोहलीनेच त्याच्यापेक्षा जास्त टी-20 धावा केल्या आहेत. विराटने 10 हजार 379 धावा केल्या आहेत.
रोहितने पंजाबविरुद्ध 17 बॉलमध्ये 3 फोर 2 सिक्सच्या मदतीने 28 धावा करून बाद झाला. पण त्याआधी त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थंपी.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोडा आणि अर्शदीप सिंह.