भारताविरुद्धच्या सामन्यात आमच्यावर दडपण नाही - अशरफूल

चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेत भारताचा उद्या बांगलादेशशी सामना होतोय. मात्र या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नसून ते भारतावरच असल्याचे विधान बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफूलने केलंय. 

Updated: Jun 14, 2017, 06:10 PM IST
भारताविरुद्धच्या सामन्यात आमच्यावर दडपण नाही - अशरफूल title=

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेत भारताचा उद्या बांगलादेशशी सामना होतोय. मात्र या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नसून ते भारतावरच असल्याचे विधान बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफूलने केलंय. 

आम्ही आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचलो. मात्र आमच्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणे ही लहान गोष्ट नाही कारण हा मिनी वर्ल्डकप आहे. भारताने गेल्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवलेय त्यामुळे आमच्यापेक्षा त्यांच्यावर अधिक दडपण असेल यात शंकाच नाही असं अशरफूल म्हणाला. 

बांगलादेशने साखळी सामन्यात न्यूझीलंडला हरवत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले.