नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा फास्टर बॉलर मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नी हसीनने मॅच फिक्सिंगचे आरोप लावले. यापूर्वी हसीनने त्याच्यावर अनैतिक संबंध आणि तिला मारहाण केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात हसीनने शमीविरोधात कोलकत्ताच्या लाल बाजार पोलिस ठाण्यात एफआयआर देखील दाखल केली होती.
या सर्व प्रकरणावर मोहम्मद शमीने मीडियासमोर आपली बाजू मांडली आहे. शमी म्हणाला की, मी नेहमी देशासाठी खेळलो आहे आणि खेळत राहीन. असे करण्यापूर्वी मी मरून जाणे पसंद करीन.
त्याचबरोबर शमी म्हणाला की, पाकिस्तानी मुलीसोबत पैशाचा कोणताही व्यवहार केलेला नाही. मी आणि माझ्या परिवाराने हसीनला संपर्क केला. मात्र तिला कोण भडकवत आहे, हे समजत नाहीएफआयआर दाखल झाल्यानंतर शमी म्हणाला, मी देखील आता कायदेशीर मार्गाने चालणार. तसंच हा कौटुंबिक प्रश्न मी बसून सोडवण्याचा प्रयत्न करेन.
As far as allegation of compromising my performance playing for the country is concerned, I would rather die than do something like this: Mohammad Shami pic.twitter.com/PGvQotXNmH
— ANI (@ANI) March 8, 2018
Hasin(wife) and her family have been saying that we will sit and talk out all issues, but I don't know who has been misleading her: Mohammad Shami pic.twitter.com/MhXKxwWpH2
— ANI (@ANI) March 8, 2018
शमीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंद असून त्यांच्यासोबत शमी अश्लिल चॅटींगही करतो. त्याचबरोबर पाकिस्तानच्या अलिस्बा नावाच्या मुलीकडून शमीने दुबईत पैसै घेतले असल्याचे हसीनने म्हणणे आहे. शमी माझ्याबरोबर देशालाही धोका देत आहे, असे गंभीर आरोप हसीनने केले.