IND VS AUS 2nd Test : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळत आहेत. टेस्ट सीरिजचा दुसरा सामना हा शुक्रवार 6 डिसेंबर पासून एडिलेड येथे सुरु झाला. या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजी निवडलेल्या टीम इंडियाने (Team India) पिंक बॉलचा सामना करताना 180 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअंती 1 विकेट गमावून 86 धावा केल्या, त्यामुळे टीम इंडिया सध्या 94 धावांनी आघाडीवर आहे. 2020 नंतर टीम इंडिया प्रथमच डे-नाइट टेस्ट सामना खेळत असून पहिल्याच दिवशी मैदानात मोठा राडा झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) संतापाच्या भरात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला बॉल फेकून मारला.
मोहम्मद सिराजला तेव्हा राग अनावर झाला जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या इनिंगवेळी तो 25 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकत होता. सिराज बॉल टाकत असताना मार्नस लाबुशेनने अचानक त्याला रोखले. सिराज रन-अप घेत होता तेव्हा लाबुशेनला साइट स्क्रीनच्या समोरून एक माणूस जाताना दिसला ज्यामुळे त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याने सिराजला रोखलं. तो व्यक्ती बियरचा ग्लास घेऊन जात होता. त्याने एकावर एक ठेवलेले ग्लास सापाप्रमाणे दिसत होते.
• Man runs behind the sight screen with a beer snake
• Marnus pulls away while Siraj is running in
• Siraj is not happyAll happening at Adelaide Oval AUSvIND pic.twitter.com/gRburjYhHg
लाबुशेनने रन-अप दरम्यान सिराजला अचानक थांबवल्यामुळे सिराज संतापला आणि त्याने बॉल स्टंप्स पासून थोडा दूर लाबुशेनच्या दिशेने फेकला आणि त्यावेळी सिराजने काही अपशब्द देखील वापरले. मात्र पुढील बॉलवरच लाबुशेनने त्याला चौकार मारला. फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअंती ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 13 धावा केल्या. तर नाबाद नॅथन मॅकस्विनीने 38 आणि मार्नस लॅबुशेनने 20 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसा अखेरीस 1 विकेट गमावून 86 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने उस्मानची विकेट घेतली.
हेही वाचा : बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड