"मोहम्मद शमी हॉटेलमध्येच Prostitutes ला बोलावून...", पत्नी हसीन जहाँचे गंभीर आरोप, सुप्रीम कोर्टात घेतली धाव

Mohammed Shami-Hasin Jahan Controversy: भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीची (Mohammad Shami) पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. पतीकडून छळ करण्यात आल्यानंतरही त्याच्यावर काहीच कारवाई न केल्याने तिने नाराजी जाहीर केली आहे.   

Updated: May 2, 2023, 10:31 PM IST
"मोहम्मद शमी हॉटेलमध्येच Prostitutes ला बोलावून...", पत्नी हसीन जहाँचे गंभीर आरोप, सुप्रीम कोर्टात घेतली धाव title=

Mohammed Shami-Hasin Jahan controversy: भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची (India cricketer Mohammed Shami) पूर्वाश्रमीची पत्नी हसीन पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) विशेष याचिका दाखल केली आहे. मोहम्मद शमीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही गेल्या 4 वर्षात त्याच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने तिने नाराजी जाहीर केली आहे. तसंच मोहम्मद शमीचे अद्यापही शरिरविक्री करणाऱ्या महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोहम्मद शमी संघासोबत दौऱ्यावर असतानाही या गोष्टींमध्ये सहभागी असतो असा तिचा दावा आहे.  

हसीन जहाँने सर्वात प्रथम 2018 मध्ये मोहम्मद शमीविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले होते. त्यावेळी तिने जाधवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मोहम्मद शमीने आपल्याविरोधातील सर्व आरोप आरोप फेटाळले असतानाही हसीन जहाँ वारंवार त्याच्याविरोधात आरोप करत असून खटल्याचा पाठपुरावा करत आहे.

मोहम्मद शमी आणि त्याचा मोठा भाऊ हबीब अहमद यांची कोलकाताच्या महिला पोलिसांच्या सेलने 2018 मध्ये याप्रकरणी चौकशी केली होती. इतकंच नाही तर अलिपोर कोर्टाने मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. पण नंतर या अटक वॉरंटवर स्थगिती आणण्यात आली होती. हसीन जहाँने शमी मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा आरोपही केला होता. पण भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने शमीला क्लीन चिट दिली.

हसीन जहाँने सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका केली आहे. यामध्ये तिने आरोप केला आहे की, कोलकातामधील सत्र न्यायालयाने शमीने गुन्हेगारी खटल्याच्या स्थगितीसाठी पैसे भरलेले नसताना आणि फक्त अटक वॉरंट जारी करण्याविरूद्ध तक्रार केलेली असतानाही त्याच्याविरोधातील कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले.

तसंच याचिकेत तिने मोहम्मद शमी हुंड्याची मागणी करायचा असा आरोप केला आहे. तसंच मोहम्मद शमी भारतीय संघासोबत दौऱ्यावर असतानाही विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. "शमी आपल्याकडून हुंड्याची मागणी करायचा आणि आणि त्याचे सतत देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत विवाहबाह्य संबंध राहिले आहेत. विशेषत: दौऱ्यांमध्ये, बीसीसीआयने सुविधा दिलेल्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये तो हे काम करत होता. आजही तो यामध्ये गुंतला आहे", असा हसीन जहाँचा दावा आहे.  

हसीन जहाँने याचिकेत आरोप केला आहे की, शमी त्यांचा दुसरा मोबाईल फोन या कामासाठी वापरत होता. HTC कंपनीच्या या मोबाईलचा क्रमांक +447864905556 असून कोलकाताच्या लाल बाजार पोलिसांनी तो जप्त केला होता. अजूनही देहविक्री करणाऱ्या महिलांशी त्याचे लैंगिक संबंध आहेत.

दरम्यान मोहम्मद शमीने जर आपल्याविरोधातील आरोप सिद्ध झाले तर आपण पत्नीची माफी मागण्यास तयार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये, कोलकाता न्यायालयाने शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला मासिक 50,000 रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. पण हसीन जहाँ त्यावर खूश नव्हती. तिने महिन्याला 10 लाख द्यावेत अशी मागणी केली होती.