Gautam Gambhir vs Virat Kohli Fight: आयपीएलमध्ये (IPL 2023) सोमवारी झालेला सामना चांगलाच गाजला. लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात जोरदार घमासान झालेलं दिसून आलं. मुख्य म्हणजे लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यामध्ये वाद झाला होता. मात्र त्यानंतर कोहलीचा गंभीरसोबतही वाद झाला. यावेळी गंभीरने (Gautam Gambhir) वादात उडी का घेतली असा सवाल उपस्थित होतोय.
लखनऊ फलंदाजी करत असताना ही घटना घडली. लखनऊच्या फलंदाजीवेळी नवीन आणि विराट कोहली यांच्यामध्ये वाद झालेला दिसला. दरम्यान यावेळी सामना संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यामध्ये जोरदार राडा झालेला दिसला.
17 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज आणि नवीन यांच्यात वादावादी झाली. यावेळी संपल्यानंतरही सिराजने बॉल स्टंपवर जोरात मारला आणि इथूनच हे प्रकरणं वाढलं. दरम्यान याचवेळी विराट कोहलीनेही या प्रकरणात उडी घेतली. विराट (Virat Kohli) आणि नवीन यांच्यातील वाद सामना संपल्यानंतर एकमेकांशी हात मिळवला आणि त्यावेळी हा वाद अजूनच वाढला.
यावेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) अंपायरशी बोलतोय. यावेळी गंभीर (Gautam Gambhir) विराटच्या वृत्तीबद्दल तक्रार करत असल्याची माहिती आहे. एकंदरीत विराटचं (Virat Kohli) कृत्य आणि वागणूक गंभीरला (Gautam Gambhir) आवडली नाही आणि तो याचबाबत अंपायरशी बोलत असल्याचं म्हटलं जातंय.
हे झाल्यानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं. यापूर्वीही आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं समोर आलं होतं.
#ViratKohli #gautamgambhir #IPL2O23 pic.twitter.com/y2ui1jj1CC
— आदित्य पंडीत (@AdityaP23166892) May 2, 2023
दरम्यान सोमवारी झालेल्या वादाचा विराट (Virat Kohli) आणि गंभीर (Gautam Gambhir) या दोघांनाही मोठा फटका बसला आहे. विराट आणि गंभीरच्या मॅच फीमध्ये 100 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकंदरीत या सामन्यातून या दोन्ही खेळाडूंना कोणतंही मानधन मिळणार नाहीये. केवळ हे दोघंच नव्हे तर काइल मेयर्सला त्याच्या चुकीसाठी 50 टक्के दंड ठोठावण्यात आला.