मुंबई : 2021 चा टी-20 विश्वचषक सुरू झाला आहे. भारताने सोमवारी पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर 7 गडी राखून मात केली. टीम इंडियाचा एक खेळाडू यावेळी चांगल्याच फॉर्ममध्ये दिसला. टी-20 विश्वचषकापूर्वी हा खेळाडू फॉर्ममध्य़े असल्याने टीम इंडियाला (Team india) मोठा फायदा होऊ शकतो.
टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad shami) धोकादायक फॉर्ममध्ये दिसत आहे. मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकात (T20 wprld cup) भारताचा सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. जेव्हाही तुम्हाला एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते, तेव्हा तुम्हाला नेहमी अशा खेळाडूंची गरज असते जे खेळाला वळण देऊ शकतील आणि तो खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी.
पहिल्या सराव सामन्यात शानदार कामगिरी
सोमवारी इंग्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात मोहम्मद शमीने 4 ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले. या सामन्यात शमीने इंग्लंडचे फलंदाज जेसन रॉय, जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले होते.
फलंदाजांमध्ये भीती निर्माण करण्याची क्षमता
मोहम्मद शमी आपल्या धारदार गोलंदाजीने कहर निर्माण करत आहे. मोहम्मद शमी चेंडूने टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावेल, कारण जेव्हा जेव्हा भारताला विकेटची गरज असते, तेव्हा मोहम्मद शमी चांगली कामगिरी करत असतो. त्याच्याकडे फलंदाजांमध्ये भीती निर्माण करण्याची क्षमता आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.