MS Dhoni : आयपीएलच्या 16 व्या ( IPL 2023 ) सिझन आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) फायनलचं तिकीट मिळवलंय. मंगळवारी झालेल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा ( Gujarat Titans ) 15 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni ) अंपायरसोबत झालेली शाब्दिक बाचाबाची चांगली व्हायरल झाली. दरम्यान यानंतर आता धोनीवर ( MS Dhoni ) बॅन येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.
यंदाच्या आयपीएलमध्ये एम एस धोनी ( MS Dhoni ) आणि अंपायर यांच्यातील नाराजी अनेकदा दिसून आली. 23 मे रोजी झालेल्या सामन्यात देखील धोनीने ( MS Dhoni ) तब्बल 9 मिनिटं अंपायरशी बाचाबाची केल्याचं समोर आलं. मात्र हे कृत्य धोनीला ( MS Dhoni ) चांगलंच महागात पडणार असल्याचं दिसतंय. यासाठी बीसीसीआय ( BCCI ) त्यांच्यावर बंदीची कारवाई करू शकते.
कालच्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत गुजरातला 173 रन्सचं आव्हान दिलं होतं. यावेळी गुजरात फलंदाजी करत असताना धोनीने ( MS Dhoni ) अंपायरकडे जाऊन एका मुद्द्यावर नाराजी दर्शवली. धोनी मैदानाबाहेरून आलेला मथिसा पथिरानाला ओव्हर देऊ इच्छित होता, मात्र अंपायरने त्याला परवानगी दिली नाही. मुळात नियमांनुसार, मैदानाबाहेर असलेल्या खेळाडूला गोलंदाजी करण्यासाठी 2 ओव्हर फिल्डींग करावी लागते. या मुद्द्यावरून अंपायरने धोनीशी वाद घातला.
जवळपास 5 मिनिटं अंपायरशी यावरून वाद घालताना दिसला. यामुळे वेळ वाया घालवल्यामुळे बीसीसीआय धोनीवर कठोर कारवाई घेऊ शकते. याचं कारण म्हणजे धोनीवर यापूर्वी स्लो ओव्हर रेटचा दंड लावला गेला होता. त्यामुळे पुन्हा त्याच्यावर हा फाईन लागला तर धोनीवर बंदी येण्याची शक्यता आहे.
नियमांनुसार, जर सतत एखादा कर्णधार स्लो ओव्हर रेटवर दोषी ठरत असेल तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येऊ शकते.
अंपायरशी बाचाबाची करण्याचा धोनीचं हे काही पहिलं प्रकरण नाही. यापूर्वी तो फिल्डवरील अंपायरशी भांडला असल्याचं समोर आलं होतं. 2019 मध्ये ही घटना घडली होती. यावेळी राजस्थान रॉयल्स विरूद्ध खेळताना अंपायरने बेन स्टोक्सच्या बॉलवर नो बॉल करार दिला होता. यानंतर धोनी रागाच्या भरात अंपायरशी वाद घालताा दिसला होता.