महेंद्र सिंग धोनीच्या मुलीचा इंस्टाग्रामवर डेब्यू

आजकाल सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांच्या नावाची चर्चा अधिक अधिक असते.

Updated: Oct 24, 2017, 04:54 PM IST
महेंद्र सिंग धोनीच्या मुलीचा इंस्टाग्रामवर डेब्यू  title=

 मुंबई : आजकाल सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांच्या नावाची चर्चा अधिक अधिक असते.

स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने शेअर होतात. यामध्ये क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या मुलीचादेखिल समावेश आहे.  
 
 झीवा ही महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीची एकुलती एक मुलगी आहे. साक्षी आणि महेंद्र झीवाचे खास फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करतात. झीवाचा निरागसपणा अनेकदा नेटकर्‍यांना भावतो. त्यामुळे धोनी आणि साक्षीप्रमाणेच अनेक क्रिकेटर्स झीवासोबत फोटो क्लिक करतात. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि झीवाचा क्युट व्हिडिओदेखील सोशलमीडियावर झपाट्याने शेअर झाला होता. 

आता महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीने झीवाचे फोटो शेअर करण्यासाठी आता इंस्टाग्रामवर तिचे स्वतंत्र अकाऊंट बनवले आहे.  zivasinghdhoni006 या नावाने इंस्टाग्रामवर झीवाचे स्वतंत्र अकाऊंट बनवले आहे. या अकाऊंटवर तिचे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.  

 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

 

साक्षी आणि धोनी दिवशी ४ जुलै २०१० रोजी विवाहबद्ध झाले. त्यांच्या आयुष्यात ६ फेब्रुवारी २०१५ दिवशी झीवाचे आगमन झाले.