विराट-शास्त्री गैरहजर, धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमचा सराव

युएईमध्ये आशिया कपला सुरुवात झाली आहे.

Updated: Sep 17, 2018, 05:28 PM IST
विराट-शास्त्री गैरहजर, धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमचा सराव title=

नवी दिल्ली : युएईमध्ये आशिया कपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी भारतानं कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. तर भारतीय टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्रीही या दौऱ्याला अनुपस्थित आहे. त्यामुळे भारतीय टीमचा वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमनं दुबईमध्ये सराव केला. धोनीनं रवी शास्त्रीची जागा घेत भारतीय बॅट्समन आणि बॉलरना प्रशिक्षण देत होता. सोशल मीडियावर धोनीचे प्रशिक्षण करतानाचे हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यानंतर धोनीनंही नेटमध्ये सराव केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

In a Recent Practice session with Team India #dhoni was seen mentoring the young players of #teamIndia . A team man Video Credit : #Xtra #msd7 #KS7

A post shared by Mahi_7781 (@mahi_778146) on

विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीमला संघर्ष करावा लागणार नाही कारण धोनी टीममध्ये आहे, असं वक्तव्य अंबती रायडूनं केलं आहे. विराटची कमी जाणवेल, पण आमच्याकडे टीममध्ये गुणवत्ता आहे. धोनी बराच काळ भारतीय टीमचा कर्णधार होता. टीमचा उत्साह वाढवण्यासाठी धोनी नेहमीच पुढे असतो. धोनीनं माझी अनेकवेळा मदत केली आहे, त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो, असं रायडू म्हणाला आहे.

वर्ल्ड कपला आता एक वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. तरीही भारतीय टीमची मिडल ऑर्डर अजूनही निश्चित नाही. त्यामुळे अंबाती रायडूला भारतीय टीममध्ये जागा बनवणं निश्चित करता येईल.