RCB vs CSK: '...नाहीतर सामना 18 व्या ओव्हरलाच गमावला असता', विजयानंतर MS Dhoni असं का म्हणाला?

Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings: जेव्हा तुम्ही 220 धावा करता तेव्हा फलंदाजांनी फटकेबाजी करत राहणं आवश्यक असतं. जर फाफ (Faf du Plessis) आणि मॅक्सीने (Glenn Maxwell) फटकेबाजी चालू ठेवलं असती तर त्यांनी सामना 18 व्या षटकापर्यंत जिंकला असता, असं धोनी (MS Dhoni) म्हणाला आहे.

Updated: Apr 18, 2023, 12:43 AM IST
RCB vs CSK: '...नाहीतर सामना 18 व्या ओव्हरलाच गमावला असता', विजयानंतर MS Dhoni असं का म्हणाला? title=
MS Dhoni,RCB vs CSK

RCB vs CSK, MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) रंगतदार झालेल्या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आहे. श्वास रोखून धरणारा सामना अंतिम ओव्हरपर्यंत गेला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 227 धावांचे लक्ष्य दिलं होतं, प्रत्युत्तरात बंगळुरूला निर्धारित षटकात केवळ 218 धावा करता आल्या. त्यामुळे आता चेन्नईने दोन अकं जोडून घेतले आहेत. सामना जिंकल्यानंतर धोनी (MS Dhoni) बोलताना एक सटीक अंदाज लावला होता, तर शिवम दुबेचं तोंडभरून कौतूक देखील केलंय.

काय म्हणाला MS Dhoni ?

जेव्हा तुम्ही बंगळुरूला (Royal Challengers Bangalore) आलात तेव्हा ती चांगली विकेट असते. सामन्याच्या सुरुवातीच्या भागात खूप दव पडतो. तुम्हाला चांगली सुरुवात करायची आहे आणि मग तुमच्या मनात जे काही आहे ते बदलायचं आहे. सुरवातीला ते थोडं अवघड होतं. त्यामधून जाणं आणि नंतर गती वाढवणं महत्वाचं आहे. ठरवल्यानुसार उत्तरार्धात शक्य तितके प्रयत्न केले गेले पाहिजे, असं धोनी (MS Dhoni) म्हणाला आहे.

जेव्हा तुम्ही 220 धावा करता तेव्हा फलंदाजांनी फटकेबाजी करत राहणं आवश्यक असतं. जर फाफ (Faf du Plessis) आणि मॅक्सीने (Glenn Maxwell) फटकेबाजी चालू ठेवलं असती तर त्यांनी सामना 18 व्या षटकापर्यंत जिंकला असता. मी विकेटच्या मागूनच आकलन करत राहतो, निकालाचा विचार करण्यापेक्षा काय करायला हवं यात मी नेहमी गुंतलेला असतो, असं धोनी (MS Dhoni) म्हणाला आहे.

आणखी वाचा - RCB vs CSK: चेन्नईच्या आव्हानासमोर आरसीबीने टाकली नांगी; थरारक सामन्यात CSK चा दमदार विजय!

शिवम दुबे (Shivam Dube) असा आहे जो सटीक मारा करू शकतो. आमच्या संघात वेगवान गोलंदाजांची समस्या आहे पण तो क्लीन हिटर आहे. आम्ही त्याच्यासाठी काही योजना आखल्या होत्या पण दुर्दैवाने जेव्हा तो कॅम्पवर आला तेव्हा तो जखमी झाला होता, त्यामुळे आम्ही त्याच्यासोबत काम करू शकलो नाही. त्याच्यावर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवायला हवा, असंही धोनी (MS Dhoni On Shivam Dube) म्हणाला आहे.