माजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...

  दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे.  सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 15, 2018, 05:10 PM IST
माजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत... title=

नवी दिल्ली :  दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे.  सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले. 

जोडगोळीची कामगिरी...

भारताचा स्पीनचे जादुगर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी पाच सामन्यात एकूण ३० विकेट घेतल्या. यात चहलच्या १४ आणि कुलदीपच्या १६ विकेटचा समावेश आहे. या दोघांच्या यशात महेंद्रसिंग धोनीचा सर्वात मोठा हिस्सा असल्याचे माजी क्रिकेट अतुल वासन यांनी म्हटले आहे. 

काय म्हटले वासन 

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत माजी क्रिकेटर अतुल वासन म्हणाले, माझ्या मते चहल आणि कुलदीपच्या यशात धोनीचा हात आहे. या दोघांनी घेतलेल्या विकेटमध्ये अर्धे श्रेय हे धोनीला जाते. त्याने स्टंप्सच्या मागे जी कामगिरी केली ती शानदार होती. 

अतुल वासन म्हणाले, मला वाटते की चहल आणि यादव यांनी धोनीचे पाय पडायला हवेत. दोन्ही गोलंदाज अनुभवी नव्हते, पण धोनी यांच्यासाठी होमवर्क करत होता. याचे क्रेडीट त्याला द्यायला हवे.