MS Dhoni Video : क्रिकेट सोडून धोनीला लागला भलताच नाद; अचानक व्हायरल झाला 'तो' व्हिडीओ

MS Dhoni Viral Video : धोनी कधी गाडी पळवताना दिसतोय. तर कधी विमानात फिरताना. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीला क्रिकेट सोडून वेगळाच नाद लागल्याचं दिसतंय. 

Updated: Sep 7, 2023, 04:08 PM IST
MS Dhoni Video : क्रिकेट सोडून धोनीला लागला भलताच नाद; अचानक व्हायरल झाला 'तो' व्हिडीओ title=
MS Dhoni, Video Viral, US Open,

MS Dhoni Spotted Watching US Open : टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार असलेला धोनी (MS Dhoni) आता आयपीएलपुरता (IPL) मर्यादित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी चर्चेमधून जवळजवळ अदृश्य झालाय. मात्र, चाहत्यांनी त्याला मनात कायमचं स्थान दिलंय. धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) आयपीएलची ट्रॉफी जिंकलीये. त्यानंतर धोनी कधी गाडी पळवताना दिसतोय. तर कधी विमानात फिरताना. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये धोनीला क्रिकेट सोडून वेगळाच नाद लागल्याचं दिसतंय. 

महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अमेरिकेला गेला आहे. धोनी अमेरिकेत नेमका कशासाठी गेलाय? अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती. अशातच आता धोनी एका सामन्यात स्पॉट झालाय. क्रिकेटच्या नव्हे तर युएस ओपनच्या... सध्या एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये धोनी यूएस ओपन मॅच पाहताना दिसतोय. अचानक धोनी कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाल्याचं पहायला मिळतंय.

त्याचं झालं असं की, यूएस ओपनमध्ये गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळवला गेला होता. त्यावेळी धोनीने हा सामना पाहण्यासाठी मैदात हजेरी लावली. सामना पाहत असताना धोनी मित्रांसोबत मस्ती करताना दिसतोय. त्याचा व्हिडीओ स्पर्धेच्या अधिकृत प्रसारकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा Video

दरम्यान, या सामन्यात कार्लोस अल्काराझ याने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा 6-3, 6-2 आणि 6-4 असा दारुण पराभव केला. या विजयासह आता अल्काराझ याने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्रिकेटर्स अनेकदा टेनिसचे सामने पाहण्यासाठी कोर्टमध्ये हजेरी लावल्याचं दिसून येतं. सचिन पाहून विराट देखील टेनिसचा चाहता आहे. अशातच आता धोनीला देखील टेनिसचं याड लागल्याचं दिसून येतंय.