close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूसोबत धोनीच्या लेकीची धमाल पाहिली?

झिवा संघातील सर्वच खेळाडूंची लाडकी आहे. 

Updated: Jun 17, 2019, 01:33 PM IST
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूसोबत धोनीच्या लेकीची धमाल पाहिली?

मुंबई : क्रिकेट विश्वचषकामध्ये सुरु असणाऱ्या सामन्यांची रंगत ही दिवसागणिक वाढत आहे. त्यातच रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेली एकंदर चुरसीची लढत पाहता खऱ्या अर्थी क्रीडा प्रेमींचा रविवार मार्गी लागला, असं म्हणायला हरकत नाही. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानावर उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच महेंद्र सिंह धोनी हासुद्धा त्याच्या कौशल्याने संघातील प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देत होता. संपूर्ण मैदानावर नजर ठेवत प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडूंचं निरिक्षण करणाऱ्या धोनीची शैली समालोचकांनाही भावली, तर इथे त्याची लेक झिवा हिसुद्धा सर्वांच्या मनाचा ठाव घेत होती. 

झिवा नेहमीच धोनीला प्रोत्साहन देताना दिसते. आपले बाबा कहीतरी भन्नाट काम करत असल्याचा आनंद कायमच तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. भारत- पाकिस्तान सामन्यातही तिचा हा अंदाज पाहायला मिळाला. पण, त्याव्यतिरिक्तही संघातील एका खेळाडूसोबतची तिची मजा- मस्ती सोशल मीडियावर लक्ष वेधून गेली. 

 
 
 
 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on

झिवा ही ऋषभ पंत याच्यासोबत धमाल करताना दिसत आहे. तर तोसुद्धा या चिमुकल्या झिवाच्या मस्तीमध्ये तिची साथ देताना दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत दिलेलं कॅप्शन पाहता झिवा आणि ऋषभ यांची चांगलीच गट्टी जमल्याचंही कळत आहे. महेंद्र सिंह धोनीची ही लेक संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाची लाडकी आहे. अनेकदा ती धोनीसोबत विविध ठिकाणी पाहायला मिळते. झिवाची ही धमालच नव्हे, तर तिच्या चातुर्याचीही अनेकदा प्रशंसा केली जाते. त्यामुळे वडिलांप्रमाणेच झिवाही सर्वगुणसंपन्न आहे, असंच चाहत्यांचं म्हणणं आहे.