close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला

आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला आहे. 

Updated: Apr 24, 2018, 07:46 PM IST
हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला

मुंबई : आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला आहे. रोहित शर्मानं या मॅचमध्ये पहिले फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या ५ मॅचमध्ये मुंबईला फक्त एकाच मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून विजयाच्या मार्गावर पुन्हा परतण्याचं आवाहन मुंबईपुढे असणार आहे. मुंबईनं गमावलेल्या चारही मॅचचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सातव्या क्रमांकावर आहे तर हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादनं ५ पैकी ३ मॅच जिंकल्या आहेत.  या मॅचमध्ये मुंबईच्या टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हैदराबादला मात्र या मॅचआधी मोठा धक्का बसला आहे. हैदराबादचा दिग्गज बॉलर भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे ही मॅच खेळू शकला नाही.

मुंबईची टीम

सूर्यकुमार यादव, एव्हिन लुईस, इशान किशन, रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, मिचेल मॅकलेनघन, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान

हैदराबादची टीम

वृद्धीमान सहा, शिखर धवन, केन विलियमसन, मनिष पांडे, शाकिब अल हसन, युसुफ पठाण, मोहम्मद नबी, राशीद खान, बसील थंपी, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल