क्रिकेटर बनला उद्योजक, गुंतवले तब्बल 1400 कोटी; भारतात करतोय 'हा' बिझनेस

Muttiah Muralitharan Business : श्रीलंकेचा क्रिकेट आयकॉन मुथय्या मुरलीधरन याने कर्नाटकात (Karnataka) मोठा बिझनेस सुरू केलाय. त्यात त्याने तब्बल 1400 कोटींची गुंतवणूक केलीये.

सौरभ तळेकर | Updated: Jun 19, 2024, 08:10 PM IST
क्रिकेटर बनला उद्योजक, गुंतवले तब्बल 1400 कोटी; भारतात करतोय 'हा' बिझनेस title=
Muttiah Muralitharan to invest 1400cr in Karnataka

Muttiah Muralitharan investment in India : श्रीलंकेचा क्रिकेट आयकॉन मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक रेकॉर्ड रचले आहेत. त्याचे काही रेकॉर्ड अजूनही कोणीही मोडू शकलं नाही. अशातच आता मुथय्या मुरलीधरन क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उद्योजिकतेकडे (Muttiah Muralitharan Business) वळाला आहे. मुथय्या मुरलीधरन हा जन्मभूमी असणाऱ्या कर्नाटकात मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधरनने कर्नाटक सरकारशी सामंजस्य करार केला असून कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात कारखाना उभारला जाणार आहे. त्यासाठी मुथय्या मुरलीधरन याने कर्नाटकच्या उद्योगमंत्र्यांची भेट घेतली.

कर्नाटकचे उच्च आणि मध्य उद्योग मंत्री एमबी पाटील यांनी पोस्ट करून याविषयी माहिती दिली. श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन याने कर्नाटकात व्यवसास वाढवण्याचा निर्णय घेतलाय. तो कोल्डड्रिंग निर्मितीक्षेत्रात उतरला आहे. चामराजनगरशिवाय धारवाड जिल्ह्यातही 'मुथय्या बेव्हरेजेस अँड कन्फेक्शनरी' या ब्रँडच्या नावाखाली गुंतवणूक वाढविण्यासाठी मुरलीधरन इच्छुक असल्याची माहिती कर्नाटकच्या उद्योगमंत्र्यांची दिली. या प्रोजेक्टसाठी मुथय्या मुरलीधरण तब्बल 1400 कोटी गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुथय्या मुरलीधरनचा हा प्रोजेक्ट जानेवारी 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. मुथय्या मुरलीधरनच्या प्रकल्पासाठी आधीच 46 एकर आधीच वाटप करण्यात आले आहे. सुरुवातीला 230 कोटी गुंतवणुकीसह नियोजन करण्यात आलं होतं. आता गुंतवणुकीत सुधारणा करून 1,000 कोटी करण्यात आली आहे. येत्या काळात याची किंमत 1400 कोटीपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.

वडिलांची परंपरा कायम

दरम्यान, मुरलीधरनचा जन्म 17 एप्रिल 1972 रोजी कँडी येथील स्थित श्रीलंकेतील एका तमिळ हिंदू कुटुंबात झाला होता. मुरलीधरनचे वडील सिन्नासामी मुथय्या हे बिस्किट बनवण्याचा यशस्वी व्यवसाय चालवतात. मुरलीधरनने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन आता उद्योग क्षेत्रात नाव कमवण्याचा निर्णय घेतलाय.