Pakistan cricket team, Nasim Shah: तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडने जीवाची बाजी लावत इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा (England vs Pakistan) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG 1st Test) यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. रावळपिंडीच्या स्टेडियमवर (Rawalpindi Cricket Stadium) पहिला सामना खेळल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडच्या झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप आणि जो रूट यांनी या चार जणांनी पहिल्या डावात शतक ठोकलंय. इंग्लंडने पहिल्या डावात आत्तापर्यंत 506 धावा केल्या आहेत.
कसोटी मालिकेपूर्वी रावळपिंडी येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला (Naseem Shah) प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याची चांगलीच फजिती झाल्याचं पहायला मिळालं. इंग्रजीत प्रश्न विचाल्यावर त्याची बोलती बंद झाल्याचं दिसून आलं. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनविषयी (James Anderson) त्याला विचारण्यात आलं होतं.
आणखी वाचा - ENG vs PAK : कधी न्यूझीलंड तर कधी इंग्लंड, पाकिस्तानचं नशीबच फुटकं! आता तरी सुधारा रे...
अँडरसनची स्तुती करत नसीमने इंग्रजीत उत्तर दिलं. मात्र नंतर इंग्रजी प्रश्न त्याला बॉऊसर जाऊ लागले. जेम्स अँडरसन एक खूप चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडून मी खूप काही शिकलोय. जेम्स अँडरसनकडे (Naseem Shah On James Anderson) पूर्वीसारखा वेग राहिला नाही तरी त्याच्याकडे खेळण्याची कौशल्य अजूनही आहे, असं नसीम म्हणाला. मात्र, त्यानंतर नसीमचं खरं इंग्रजी समोर आलंय. त्यानंतर नसीमला घाम फुटला.
Never a dull moment with Naseem Shah #PAKvENG pic.twitter.com/yhdKl8T2km
— Farid Khan (@_FaridKhan) November 29, 2022
दरम्यान, एक इंग्रजी (Naseem Shah English) प्रश्न नसीमला कळला नाही. त्यावेळी मला फक्त 30 टक्के इंग्रजी येते. माझी इंग्रजी संपली, असं वक्तव्य नसीमने केलं. त्यानंतर भर पत्रकार परिषदेत (Press Conference) हास्यकल्लोळ पहायला मिळाला. वयाच्या 40 व्या वर्षी अँडरसन खेळत आहे आणि अजूनही खूप तंदुरुस्त आहे, हेच मोठं काम आहे, असं नसीम म्हणाला.