Hardik-Natasa: 'या' अभिनेत्रीच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली नताशा; घटस्फोटावर प्रश्न विचारताच म्हणाली...!

Is Natasa Hardik Separated? : एका दाव्यानुसार, नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिकसोबतचे फोटो देखील डिलीट केलेत. याशिवाय तिने तिच्या नावातून पंड्या हे आडनाव देखील काढून टाकल्याचं पहायला मिळालंय. 

सुरभि जगदीश | Updated: May 26, 2024, 08:40 AM IST
Hardik-Natasa: 'या' अभिनेत्रीच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली नताशा; घटस्फोटावर प्रश्न विचारताच म्हणाली...! title=

Is Natasa Hardik Separated? : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नाकाशा स्टॅनकोविक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. अशातच दोघंही घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर पहायला मिळाल्या. एका दाव्यानुसार, नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिकसोबतचे फोटो देखील डिलीट केलेत. याशिवाय तिने तिच्या नावातून पंड्या हे आडनाव देखील काढून टाकल्याचं पहायला मिळालंय. दरम्यान घटस्फोटावर प्रश्न विचारताच नताशाची पहिली रिएक्शन काय होती, हे पाहूया. 

काय म्हणाली नताशा? 

अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक नुकतीच एका व्यक्तीसोबत स्पॉट झाली. हा व्यक्ती दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्स इलिक होता. तो एका रेस्टॉरंटमध्ये दिसला होता. दरम्यान दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी एका पत्रकाराने तिला घटस्फोटाच्या अफवांवर प्रश्न विचारला, यावर ती स्पष्टपणे काहीही बोलली नाही. Thank You so much असं म्हणून ती तिथून पुढे निघून गेली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नताशाने सोशल मीडियावर केली होती खास पोस्ट

दोघांच्या नात्यामध्ये घटस्फोटाच्या अफवा असतानाच नताशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टने खळबळ उडाली. नताशाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो टाकला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका स्टोरीमध्ये ती वर्कआऊट करताना दिसतेय. तर दुसऱ्या स्टोरीत तिने ड्रायव्हिंगग स्कूलचं साईनबोर्ड टाकलं असून त्यावर 'आता कोणीतरी रस्त्यावर येणार आहे' असं लिहिलं आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. 

एका रिपोर्टमध्ये नताशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या आडनाव हटवल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी नताशा इन्स्टाग्रामवर आपलं नाव नताशा स्टेनकोविक पांड्या असं लावत होती. पण तिने आता पांड्या आडनाव काढून टाकलं आहे. या पोस्टनंतरच हार्दिक आणि नताशाच्या घस्फोटाची चर्चा सुरु झाली.

हार्दिकच्या संपत्तीचा 70 टक्के भाग मिळणार?

दरम्यान, पोटगीच्या स्वरुपात नताशाला हार्दिकच्या एकूण संपत्तीपैकी 70 टक्के भाग मिळणार असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय. हार्दिक आणि नताशाच्या नात्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, किंवा या दोघांपैकी कोणीही यावर कोणतीही प्रतिक्रियासुद्धा दिलेली नाही.