आपल्या वडिलांचाच रेकॉर्ड मोडणारा 'हा' क्रिकेटर

वडिलांपेक्षा मुलं सरस असतात असं आपण अनेकदा ऐकलं आहे. तसंच काहीस माजी भारतीय क्रिकेटर नयन मोंगियाच्या मुलाच्या बाबतीत झालं आहे. 

Updated: Nov 15, 2017, 01:13 PM IST
आपल्या वडिलांचाच रेकॉर्ड मोडणारा 'हा' क्रिकेटर  title=

नवी दिल्ली : वडिलांपेक्षा मुलं सरस असतात असं आपण अनेकदा ऐकलं आहे. तसंच काहीस माजी भारतीय क्रिकेटर नयन मोंगियाच्या मुलाच्या बाबतीत झालं आहे. 

मोहित मोंगियाने आपल्या वडिलांचा रेकॉर्ड मोडत क्रिकेट क्षेत्रात एक पाऊल पुढे ठेवलं आहे. नयन मोंगिया भारतीय संघात विकेटकिपर -फलंदाज होते. मोंगियाचा मुलगा मोहितने हल्लीच अंडर १९ क्रिकेट संघात धुमाकूळ घातला आहे. मोहितने एका टूर्नामेंटमध्ये आपल्या वडिलांचा ३० वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. 

मोहित मोंगियाने कूच बिहार ट्रॉफीमध्ये बडोदा टिमची कमान सांभाळली. या टूर्नामेंटमध्ये मोहितने आपल्या वडिलांचा ३० वर्ष जुना सर्वाधिक स्कोर रेकॉर्ड मोडला आहे. मोहितने मुंबई विरूद्ध २४५ चेंडूत नाबाद २४० नाबाद धावा केल्या आहे. हा बडोद्यातील कूच बिहार ट्रॉफीमध्ये सर्वाधिक स्कोर आहे. या अगोदर नयन मोंगियाने १९८८ मध्ये केरळ विरूद्ध २२४ रन केले होते. 

मुलाच्या या कर्तबगारीवर नयन मोंगिया असं म्हणाला की, मी भरपूर खूष आहे की, माझ्या मुलाने हा रेकॉर्ड मोडला आहे. मोहित खूप चांगला खेळत आहे आणि तो या रेकॉर्डचा मानकरीच आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मोहितने मला फोन केला होता. तो या रेकॉर्डमुळे भरपूर खूष आहे. भारतकडून ४४ टेस्ट आणि १४० वन डे खेळळेल्या नयन यांनी सांगितले की, तो फक्त डबल सेंच्युरी करून शांत नाही बसला पाहिजे.