close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक

 नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.  

Surendra Gangan PTI | Updated: Jul 18, 2018, 08:40 PM IST
भालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक
छाया : .twitter @Neeraj_chopra1

पॅरीस :  भालाफेकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे. नीरज चोप्रा याने आज भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे. फ्रान्समधील सॉटेव्हिले अॅथलेटीक्स मीट स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा याने सुवर्ण कमाई केली. त्यांने ८५.१७ मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले.

२०१२ चा लंडन ऑलिम्पिकच सुवर्णपदक विजेत्या केशोरन वॉलकॉटला मागे टाकत सोनेरी यश मिळवले. याआधी यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या सुवर्णपदकानंतर नीरजवर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होतोय.