Kane Williamson: गेल्या काही दिवसांपासून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson ) काही प्रमाणात चर्चेत आहे. अशातच केनच्या एका विधानामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केनने बुधवारी न्यूझीलंडचा माजी खेळाडू रॉस टेलरच्या वक्तव्य फेटाळून लावलं आहे. यावेळी टेलरने नील वॅगनरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या दोन टेस्ट सामन्यापूर्वी नील वॅगनरला 'निवृत्ती' घ्यायला लावली होती, असं विधान केलं होतं. दरम्यान या विधानावर केन विलियम्सनने ( Kane Williamson ) प्रत्युत्तर दिलं आहे.
न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सिरीज सुरु असून या टेस्ट सिरीजपूर्वी नील वॅगनरने निवृत्तीची घोषणा केली होती. नीलला ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये समाविष्ट केलं नव्हतं. यानंतर टीमचा माजी खेळाडू रॉस टेलरने नीलला बळजबरी निवृत्ती घ्यायला लावली होती, असं म्हटलंय.
न्यूझीलंड टीमचा 37 वर्षीय वॅगनर पहिल्या टेस्टमध्ये सबस्टीट्यूट म्हणून मैदानात उतरला. यावेळी काही तो ड्रिंक घेऊन मैदानावरही गेला. न्यूझीलंडने हा सामना 172 रन्सने गमावला. वर्तमान कर्णधार टीम साऊदीसोबत पत्रकारांशी बोलताना केन विलियम्सन ( Kane Williamson ) म्हणाला की, मी टेलरची टिप्पणी पाहिली नाही.
केन विलियम्सनने ( Kane Williamson ) दिलेल्या माहितीनुसार, 'मला वाटत नाही की, कोणीही बळजबरीने निवृत्ती घेतली आहे. वॅगनरने गेल्या आठवड्यात निवृत्ती घेत एक चांगला वेळ टीमसोबत घालवला आहे. आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये काही क्षण अनुभवता आले. त्याने या टीमसाठी अविश्वसनीय गोष्टी केल्या आहेत.
टेलरने 'ESPNcricinfo' च्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की, वॅगनरला सक्तीने निवृत्तीची विनंती करण्यात आली आहे. मला वाटतं, आता या गोष्टी थोड्या थोड्या समजू लागल्या आहेत. मला वाटते की, ही सक्तीची निवृत्ती आहे. वॅगनरची पत्रकार परिषद ऐकली तर तो निवृत्त होत होता.