कोलंबो : निडास ट्रॉफीत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी 'आज करो वा मरो'ची मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये बांगलादेशच्या बॉलर्सने श्रीलंकन बॅट्समनला चांगलाच घाम फोडला आणि मॅचवर पकड निर्माण केली.
५० रन्सच्या आतमध्येच श्रीलंकेची अर्धी टीम माघारी परतल्याने बांगलादेशच्या टीमच्या टीमचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. मात्र, त्यानंतर थिसारा परेरा आणि कुसल परेरा या दोघांनी टीमला सावरलं. त्यामुळे श्रीलंकन टीमने २० ओव्हर्समध्ये १५९ रन्सपर्यंत मजल मारली.
श्रीलंकन टीमकडून कुसल परेराने ४० बॉल्समध्ये ६१ रन्सची तुफानी खेळी खेळली यामध्ये ७ फोर आणि एका सिक्सरचा समावेश आहे. तर त्याला साथ दिली ती म्हणजे थिसारा परेला याने. थिसारा परेराने ३७ बॉल्समध्ये ५८ रन्सची खेळी खेळली. यामध्ये ३ फोर आणि ३ सिक्सरचा समावेश आहे.
दोन्ही संघाकडे एका विजयासह प्रत्येकी दोन दोन गुण आहेत. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात भारताला हरवले होते. त्यानंतर बांगलादेशने श्रीलंकेला सहजरित्या हरवले.
तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशला सहा विकेटनी हरवले. यामुळे तिनही संघाकडे प्रत्येकी दोन गुण झाले होते. त्यानंतर भारताने बांगलादेश आणि श्रीलंकेला हरवत फायनल गाठली.