प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर नीता अंबानी Mumbai Indians च्या ड्रेसिंग रुममध्ये, रोहित अन् पांड्याला काय म्हणाल्या? पाहा Video

Nita Ambani talks In MI dressing Room : अखेरच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजय मिळवता आला नाही. त्यानंतर मालक नीता अंबानी यांनी थेट ड्रेसिंग रुम गाठलं अन् खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सौरभ तळेकर | Updated: May 19, 2024, 04:24 PM IST
प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर नीता अंबानी Mumbai Indians च्या ड्रेसिंग रुममध्ये, रोहित अन् पांड्याला काय म्हणाल्या? पाहा Video title=
Nita Ambani talks In MI dressing Room

Nita Ambani wishes for T20 World Cup : कॅप्टन हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात खास कामगिरी करता आली नाही. अखेरच्या सामन्यात देखील मुंबईला विजय मिळवता आला नसल्याने ड्रेसिंग रुममध्ये (MI dressing Room) निराशाजनक परिस्थिती होती. अशातच मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी (Nita Ambani) यांनी ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली अन् खेळाडूंमध्ये जोश भरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी खेळाडूंनी वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नीता अंबानी यांचा व्हिडीओ शेअर केलाय.

काय म्हणाल्या नीता अंबानी?

यंदाचा हंगाम आपल्यासाठी खूप निराशाजनक राहिला आहे. काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत. आपल्या सर्वांना अपेक्षा होती. पण मी म्हणेल की मुंबई इंडियन्सची फॅन्सची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे जेव्हा आपण मुंबई इंडियन्सची जर्सी घातलो, हा क्षण खास असतो. मला वाटतं की आपण पुन्हा आपल्या चुकांबद्दल विचार करू, असं निता अंबानी म्हणाल्या आहेत.

इथं उभ्या असलेल्या अनेकांनी इथून पुढं आता वर्ल्ड कप खेळायचा आहे. अनेक खेळाडू त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व करतायेत. त्यांना शुभेच्छा.. तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियाकडून वर्ल्ड कप खेळतील. सर्व भारतीय तुम्हाला चिअर्स करतील आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा असं निता अंबानी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये म्हणाल्या.

दरम्यान, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामन्यात विजय मिळवता आलाय. 10 सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. आयपीएलच्या इतिहासात केवळ दोन वेळा अशी परिस्थिती मुंबई इंडियन्सवर आली होती. यंदाच्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला तर जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामीतल संपूर्ण संघ - रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (C), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.