Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी अनेक मोठे बदल पहायला मिळालेत. यामधील एक बदल म्हणजे, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्मा डावलून हार्दिक पंड्याकडे देण्यात आलंय. दरम्यान आयपीएल सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्याने एक मोठं विधान केलं आहे.
रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. आयपीएल सुरू होण्याआधी हार्दिकने एक मोठं विधान केलं आहे की, यावेळी त्यांची टीम शानदार कामगिरी करणार आहे. हार्दिकच्या म्हणण्यानुसार, आम्ही असं क्रिकेट खेळणार आहे की कोणीही ते विसरू शकणार नाही.
मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने गुजरात टायटन्सशी करार करून हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. याशिवाय त्याला रोहितच्या जागी कर्णधार देखील निवृत्त केलं. यावेळी 17 वा सिझन सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्या म्हणाला की, त्याचा संघ आयपीएलमध्ये असा खेळ दाखवेल की कोणीही विसरू शकणार नाही.
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सिझनपूर्वी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडलं आणि तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. हार्दिकने 2015 मध्ये मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तो 2022 मध्ये गुजरात संघात सामील झाला आणि त्याच सिझनमध्ये त्याने गुजरातच्या टीमला चॅम्पियन बनवलंय.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणतो, 'ही ( मुंबईची ) जर्सी घालण्याचा अनुभव वेगळा आहे. इथून प्रवास सुरू झाला आणि आता आम्ही घरी परतलो. आम्ही असे क्रिकेट खेळू की सर्वांना अभिमान वाटेल आणि कोणीही विसरू शकणार नाही.'
यावेळी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर म्हणाले, 'हार्दिकला माझ्यापेक्षा चेंजिंग रूमची अधिक माहिती आहे. आगामी सिझनसाठी तो उत्साही आहे आणि आम्ही त्याचे परत स्वागत करतो. टीममध्ये काही नवीन चेहरे आहेत आणि आम्ही लवकरच लय पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश बेधवल, आकाश माधव, कुमार कार्तिकेय. , रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.