... तर क्रिकेटपटूंना दोन वर्षांची शिक्षा; बीसीसीआयचा निर्णय

क्रिकेटपटूंना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Updated: Jul 20, 2018, 05:56 PM IST
... तर क्रिकेटपटूंना दोन वर्षांची शिक्षा; बीसीसीआयचा निर्णय title=

नवी दिल्ली: जर एखाद्या क्रिकेटपटूनं खोटा जन्माचा दाखला सादर केला किंवा जन्म दाखल्याबरोबर छेडछाड केली तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याती येईल असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. भारतीय क्रिकेटला वयचोरीची कीड लागली आहे, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे. यामुळेच याबाबत बीसीसीआयने कडक भूमिका घेतली आहे. या निर्णयाचं भारतीय क्रिकेट वर्तुळात स्वागत केले जात आहे. वयचोरी केल्यास आता क्रिकेटपटूंना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

जर एखाद्या खेळाडूने खोटा जन्माचा दाखला सादर केला किंवा जन्म दाखल्याबरोबर छेडछाड केली तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर दोषी आढळलेल्या खेळाडूवर दोन वर्षांनी बंदीही घालण्यात येईल, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने सांगितले आहे.