WTC: टेस्ट फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा ( Team India ) खेळ म्हणावा तसा चांगला होताना दिसत नाहीये. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेली टेस्ट सिरीज भारताता जिंकता आली नाही. त्यानंतर आता इंग्लंडविरूद्ध सुरु असलेल्या टेस्ट सिरीजमध्येही टीम इंडियाला ( Team India ) पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship ) जाऊन टीम इंडियाला ( Team India ) एकदाही विजय मिळवता आला नाही. अशातच आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ( ICC World Test Championship ) फायनल गाठण्यासाठी सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरूद्धची टेस्ट सिरीज महत्त्वाची मानली जाते. अशातच या सिरीजमध्ये झालेल्या पहिल्या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) पॉईंट्स टेबलवर नजर टाकल्यास भारत थेट पाचव्या क्रमांकावर गेला आहे. भारताला पाच सामन्यांमध्ये 2 विजय, दोन पराभव आणि एका ड्रॉसह बांगलादेशाच्या खालच्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज या दौऱ्यापासून WTC च्या फायनलची सायकल सुरु झाली आहे. 12 जुलै 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा विजय झाला होता तर दुसरी टेस्ट ड्रॉ झाली. यानंतर बॉक्सिंग डे टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभव आणि पुढच्या सामन्यात विजय मिळवल्याने भारताच्या खात्यात विजयाची नोंद आहे. यानंतर मात्र इंग्लडविरूद्ध झालेल्या पराभवामुळे फायनलचं गणित फिस्कटलं आहे.
दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( ICC World Test Championship ) फायनलिस्ट असलेली टीम इंडिया ( Team India ) या सिरीजच्या सुरुवातीलाच मागे पडताना दिसतेय. टीम इंडिया ( Team India ) WTC टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचली होती. आता टीमला स्थान सुधारण्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारताला या सिझनच्या शेवटी ऑस्ट्रेलियात पाच टेस्ट सामन्यांची सिरीज खेळायची आहे. त्याआधी बांगलादेशसोबत दोन टेस्ट होणार आहे. या टेस्ट मालिकेनंतर न्यूझीलंड टीमविरुद्ध मायदेशात 3 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता डब्ल्यूटीसी फायनलचा मार्ग सोपा नाहीये. आता इंग्लंडविरूद्धच्या सिरीजमध्ये उरलेल्या चारही टेस्टमध्ये विजय मिळवल्यास हा मार्ग थोडा सोपा होण्याची शक्यता आहे.