VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Asia Cup 2022 : सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले.  पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या (PAK vs AFG) बॉलरवर बॅट उगारली.

Updated: Sep 7, 2022, 11:56 PM IST
VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट title=

Pakistan vs Afghanistan : आशिया कप टी-20 स्पर्धेतील (Asia Cup 2022) 'सुपर फोर (Super 4) सामन्यात पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा (Pakistan vs Afghanistan) एका विकेटने पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केलं. या सामन्यादरम्यान गदारोळ झाला. सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले.  पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या बॉलरवर बॅट उगारली. या सर्व घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (pak vs afg asia cup 2022 pakistan asif ali miss behaviour with afghan bowler fareed ahmed malik after dismissed at sharjah cricket stadium video viral)

पाकिस्तानचा रडीचा डाव

अफगाणिस्तानने पाकिस्तानला विजयसाठी अवघ्या 130 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी या 130 धावांचं शानदारपणे बचाव करत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला. त्यामुळे सामना रंगतदार झाला. 

त्याआधी 19 व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमदने आसिफ अलीला (Asif Ali) मोक्याच्या क्षणी आऊट केलं. 

आसिफ आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रुमच्या दिशेने जात होता. तेव्हाच फरीद आसिफला आऊट केल्याचा जल्लोष करत होता. त्यामुळे आसिफ चिडला. त्यामुळे आसिफने आधी फरीदला धक्का मारला. त्यानंतर अंगावर बॅट उगारली. यानंतर पंचानी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा पाकिस्तानची चिडखोरगिरी समोर आली.

अफगानिस्तान प्लेइंग इलेवन : हजरतुल्लाह जजई, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनत, राशिद खान, अजमतुल्लाह ओमरजई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक आणि फजलहक फारूकी. 

पाकिस्तान प्लेइंग इलेवन : मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), बाबर आजम (कॅप्टन), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन आणि नसीम शाह.