या स्टार खेळाडूला सामना सुरु असताना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, कोण आहे तो क्रिकेटर?

खेळाडूला सामन्यादरम्यान त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

Updated: Dec 21, 2021, 07:03 PM IST
या स्टार खेळाडूला सामना सुरु असताना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, कोण आहे तो क्रिकेटर? title=

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. एका खेळाडूला सामन्यादरम्यान त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत हा प्रकार घडला आहे.पाकिस्तानचा फलंदाज आबिद अलीला रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. सामन्यादरम्यान छातीत दुखु लागल्याने रुग्णालयात नेलं असल्याचं सांगितलं जात आहे. (Pakistan cricketer abid ali admitted in hospital due to chest pain)

पाकिस्तानचा कसोटी सलामीवीर फलंदाज आबिद अलीला कायद-ए-आजम या स्पर्धेतील सामन्यादरम्यान छातीत दुखत असल्याचं जाणवलं. रिपोर्टसनुसार, हा सामना यूबीएल क्रिकेट ग्राऊंडवर खैबर पख्तूनख्वा विरुद्ध मध्य पंजाब यांच्यात खेळवण्यात येत होता. आबिद मध्य पंजाब टीमकडून खेळत होता.   

आबिद 61 धावांवर बॅटिंग करत होता. या दरम्यान त्याला 2 वेळा छातीत त्रास जाणवला. त्यामुळे आबिदला ड्रेसिंग रुममध्ये परतावं लागलं. 

नक्की कारण काय? 

आबिदवर डॉक्टराचं पथक लक्ष देऊन आहे. मात्र आबिदला नक्की काय त्रास झाला, याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. 
"आबिदला नक्की काय झालंय हे आता सांगता येणार नाही. संपूर्ण उपचारानंतर नक्की कारण समजू शकेल, अशी माहिती मध्य पंजाब टीमचे व्यवस्थापक अशरफ अली यांनी दिली.