बाउंसर लागल्याने पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात नेहमीच दुर्दैवी अपघात होताना आपण पाहिले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. असाच पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूला बॅटींग करताना बाऊंसर डोक्यावर लागल्याने त्याचा मृत्यू झालाय.

Updated: Aug 16, 2017, 04:19 PM IST
बाउंसर लागल्याने पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू title=

कराची : क्रिकेटच्या मैदानात नेहमीच दुर्दैवी अपघात होताना आपण पाहिले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. असाच पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूला बॅटींग करताना बाऊंसर डोक्यावर लागल्याने त्याचा मृत्यू झालाय.

पीसीबीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आणि खेळाडूंच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. पाक मीडिया रिपोर्टनुसार, ‘युवा खेळाडू हुबेर अहमद १४ ऑगस्टला एका क्लबमध्ये क्रिकेट मॅच खेळत होता. फलंदाजी दरम्यान एक बाऊंसर बॉल थेट जुबेरच्या डोक्यावर आदळला, ज्यामुळे त्याचा मैदानात जागेवरच मृत्यू झाला’.

पीसीबीने ट्विटर हॅंडलवर लिहिले की, 'जुबेर अहमदच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, खेळताना नेहमी सुरक्षा उपकरण जसे की हेलमेट वापरायला पाहिजे. जुबेरच्या परिवाराबद्दल आम्हाला सहानुभूती आहे’. 

मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर अहमदने ही घटना घडली तेव्हा हेलमेट घातलं नव्हतं आणि बॅटींग करत होता. यातून हे दिसतं की, गल्लीतील असो वा मैदानातील क्रिकेट किंवा इतरही खेळ खेळताना सुरक्षेकडे लक्ष द्यायला हवं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेविड वॉर्नर सुद्धा डोक्यावर बाऊंसर लागल्याने जखमी झाला. डोक्यावर बॉल लागल्याने ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिल ह्यूजचा मृत्यू झाला होता.