सोशल मीडियावर व्हायरल झाली पाक क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी

पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलने ट्विटरवरुन आपण सुरक्षित असल्याची माहिती दिलीये. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 29, 2017, 07:05 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल झाली पाक क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी title=

मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलने ट्विटरवरुन आपण सुरक्षित असल्याची माहिती दिलीये. एका अपघातात उमर अकमलचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. ही अफवा सोशल मीडियावर पसरताच लोकांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. 

अपघाताचा फोटो झाला व्हायरल

एका व्यक्तीच्या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर आले. या व्यक्तीचा चेहरा अकमलशी मिळताजुळता असल्याने अकमलचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. 

 

जेव्हा ही बातमी अकमलला समजली. तेव्हा अकमलने ट्विटरवरुन आपल जिवंत असल्याची कबुली दिली. अकमल म्हणाला, मी सुरक्षित आहे आणि व्यवस्थित आहे. लाहोरमध्ये आहे. सोशल मीडियावर आलेली मृत्यूची बातमी अफवा आहे. लवकरच नॅशनल २० कप २०१७मध्ये दिसेन.