पाकिस्तानच्या 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात, पीसीबी संघातून आऊट करण्याच्या तयारीत

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आपल्या संघाच्या माजी कर्णधाराबाबत मोठा दावा केला आहे. 

Updated: Jun 11, 2022, 06:36 PM IST
 पाकिस्तानच्या 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात, पीसीबी संघातून आऊट करण्याच्या तयारीत  title=

मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद यांची कारकीर्द धोक्यात सापडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी मुख्य निवडकर्त्यांसोबतच्या बैठकीत मोठं विधान केले आहे.संघाला आता एक नवा यष्टिरक्षक फलंदाज मिळाला असल्याचे विधान त्यांनी केले आहे. या विधानावरून आता सर्फराज अहमद यांची कारकीर्द जवळपास संपल्याचे म्हटले जात आहे.  
   
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आपल्या संघाच्या माजी कर्णधारासाठी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद बराच काळ संघाबाहेर आहे आणि आता रमीझ राजानेही कारकीर्द जवळपास संपल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने दीर्घकाळ पाकिस्तानी संघाची कमानही सांभाळली होती. मात्र खराब फॉर्म आणि वाढत्या वयामुळे प्लेइंग-11 मध्ये त्याला स्थान मिळू शकले नव्हते. सरफराज अहमदने 2021 साली शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. सध्या तो खराब फॉर्मपासून झूंजत होता. अशा स्थितीत सर्फराज अहमदचे संघात पुनरागमन करणे कठीण आहे.

सर्फराज अहमदने पाकिस्तानसाठी 117 सामन्यात 2315 धावा केल्या आहेत, तर 49 कसोटी सामन्यांमध्ये 2657 धावा केल्या आहेत. T20 बद्दल बोलायचे झाले तर सरफराजने 61 T20 सामन्यात फक्त 818 धावा केल्या आहेत. आकडेवारीतून त्यांनी इतकी सुमार कामगिरी केल्याची दिसुन येत नाही. त्यात वाढते वय  अनफिट असल्या कारणाने आता पीसीबीने त्याचा रिप्लेसर शोधलाय. 

पाकिस्तानी मीडियानुसार, रमीझ राजा यांची मुख्य निवडकर्त्यांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीत रमीझ राजा यांनी संघाला आता एक नवा यष्टिरक्षक फलंदाज मिळाला असल्याचे विधान केले होते. हा नवीन खेळाडू  नवा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद हरिसबद्दल आहे. जो गेल्या काही काळापासून पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करत आहेत, त्यामुळेच संघासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

21 वर्षीय मोहम्मद हरिसने पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मीकडून खेळताना जबरदस्त खेळ दाखवला. यानंतर त्याला पाकिस्तानी संघात संधी मिळाली आणि आता मोहम्मद हरिसने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केले आहे.