शाहिद अफ्रिदीची लेकीसाठी भावुक पोस्ट; म्हणतो 'माझं पहिलं प्रेम...'

Shahid Afridi Daughter Marriage: शाहिद अफ्रिदीने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने लेकीसाठी (Aqsa Afridi marriage) भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.

Updated: Jul 9, 2023, 10:21 AM IST
शाहिद अफ्रिदीची लेकीसाठी भावुक पोस्ट;  म्हणतो 'माझं पहिलं प्रेम...' title=
Shahid Afridi emotional post on twitter

Shahid Afridi Daughters Marriage:  पाकिस्तानचा (Pakistan Cricket Team) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची मुलगी अक्सा आफ्रिदी हिचं 7 जुलै रोजी लग्नसोहळा पार पडला. कराचीच्या आलिशान हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा (Shahid Afridi Daughter Wedding) पार पडला. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटू या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशातच आता शाहिद अफ्रिदीने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने लेकीसाठी भावनिक पोस्ट (Shahid Afridi Emotional Post) देखील लिहिली आहे.

आपल्या मुलीसाठी तिच्या लग्नाच्या भव्य प्रसंगी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. त्यावेळी त्याने एका बापाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सरफराज अहमद, इमाम-उल-हक, शान मसूद, हसन अली, अमीर जमाल आणि शाहीन शाह आफ्रिदी यांसारख्या खेळाडूंनी कराचीतील लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

पोस्टमध्ये काय म्हणाला शाहिद अफ्रिदी?

मला असं वाटतं की कालच जेव्हा मी तुला माझ्या हातात धरलं होतं आणि त्या दिवशी मी स्वतःला वचन दिलं होतं की मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तू तुझ्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करणार असलीस तरी माझं हृदय तुझ्यासोबत राहील. कारण मी तो माणूस आहे ज्यानं तुझ्यावर प्रथम प्रेम केलं. अल्लाह तुम्हा दोघांनाही त्याच्या कृपेत ठेवो आणि तुम्हाला एकत्र सुंदर आयुष्य घडवण्याची संधी देवो, असं शाहिद अफ्रिदी म्हणाला आहे.

पाहा पोस्ट -

दरम्यान, यापूर्वी शाहिदने त्याची धाकटी मुलगी (Shahid Afridi Daughters) अंशाचा विवाह पाकिस्तानी क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदीसोबत केला होता. तर आफ्रिदीने आपल्या मोठ्या मुलीचे लग्न गेल्या वर्षी 2022 मध्ये नसीर नसीर खानसोबत केलं होतं.