मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंपायरचा मृत्यू

मॅच सुरु असताना मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंपायरचा मृत्यू झाला आहे.

Updated: Oct 8, 2019, 04:50 PM IST
मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंपायरचा मृत्यू title=

कराची : मॅच सुरु असताना मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंपायरचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये क्लब मॅच सुरु असताना ही घटना घडली आहे. नसीम शेख असं मृत्यू झालेल्या अंपायरचं नाव आहे. पाकिस्तानमधल्या क्रिकेट रसिकांनी नसीम शेख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार नसीम शेख यांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ५२ वर्षांच्या नसीम शेख यांना हृदयविकाराचा त्रास आधीपासूनच होता. याचवर्षी त्यांच्यावर एंजियोग्राफी झाली होती.

मॅच सुरु असतानाच अंपायर नसीम शेख मैदानात पडले. अॅम्ब्यूलन्स बोलवून शेख यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण रस्त्यातच त्यांचं निधन झालं. याचवर्षी ब्रिटनमध्येही अशाच प्रकारे अंपायरला जीव गमवावा लागला होता. ८० वर्षांच्या जॉन विलियम्स यांच्या डोक्याला बॉल लागला होता. रुग्णालयात नेत असतानाच विलियम्स यांचा मृत्यू झाला.