ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी पी व्ही सिंधु सज्ज, अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय

Paris Olympics 2024: भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. करोडो भारतीयांना सिंधुकडून पदकांची अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीने कसून सराव केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 26, 2024, 08:51 PM IST
ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी पी व्ही सिंधु सज्ज, अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय title=

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokiyo Olympic) भारताने सात पदकं जिंकली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) हा विक्रम मोडणार का याकडे करोडो भारतीय क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. पदकाची सर्वाधिक अपेक्षा आहे ती  बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू (P V Sindhu) आणि गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांच्याकडून. भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. पीव्ही सिंधू गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्ही. पण आता गेले आठ महिने दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्याने आत्मविश्वास वाढल्याचं सिंधुने म्हटलं आहे. 

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणार?
पी व्ही सिंधुचं हे तिसरं ऑलिम्पिक आहे. याआधी तीने रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होता. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात ती यशस्वी झाली तर तिची पदकांची हॅटट्रीक होईल आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरेल. पॅरिसमध्ये दाखल झाल्यावर सिंधुने पोर्टे डे ला चॅपेल एरिनामध्या सराव केला. यानंतर मीडियाशी बोलताना तीने सुवर्ण पदक जिंकणं आपलं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे पदकं पहिलं आहे की दुसरं यापेक्षा देशासाठी पदकं जिंकणं महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया तीने दिली. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधुसमोर आव्हान
'ऑलिम्पिकमध्ये भाग घेते तेव्हा प्रत्येक ऑलिम्पिक आपल्यासाठी नवीन असतं. त्यामुळे प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हेच माझे ध्येय असते. या ऑलिम्पिकमध्ये पदकांचीच हॅट्ट्रिक पूर्ण करेन,असं सिंधुने म्हटलं आहे. पॅरिसला येण्यापूर्वी सिंधूने जर्मनीतील सारब्रुकेन इथल्या स्पोर्टकॅम्पस सार इथं सराव केला, हे ठिकाणी समुद्रसपाटीपासून उंच असून तिथलं हवामान आणि परिस्थिती पॅरिसप्रमाणेच आहे.

पॅरिसमधल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपण खोलीत एक हायपोक्सिक चेंबर (कमी ऑक्सिजन) बनवला आणि काही दिवस तिथेच झोपली. हायपोक्सिक चेंबर्स खेळाडूचे शरीर उंचावर खेळण्यासाठी तयार करण्यास मदत करतं असं, सिंधू म्हणाली, 'सरावासाठी उंच ठिकाणी जाऊ शकत नाही. तेव्हडा वेळ माझ्या नव्हता आणि म्हणून इतर ठिकाणई जाण्यापेक्षा इथे अशी परिस्थिती निर्माण करणे अधिक योग्य असल्याचं सिंधुने म्हटलंय.

सिंधुने आपल्या स्ट्रोक्समध्येही सुधारणआ केली आहे. एकेरी सामने खेळणं जास्त आव्हानात्मक असतं, यासाठी आपण पूर्ण तयार असल्याचा आत्मविश्वासही सिंधुने व्यक्त केलाय.