IND Vs SA 3rd ODI: तिसऱ्या निर्णायक वनडेसाठी ही प्लेईंग 11 मैदानात उतरणार, कोणाला मिळणार संधी? वाचा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना गमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे.

Updated: Oct 10, 2022, 05:06 PM IST
IND Vs SA 3rd ODI: तिसऱ्या निर्णायक वनडेसाठी ही प्लेईंग 11 मैदानात उतरणार, कोणाला मिळणार संधी? वाचा title=

IND Vs SA 3rd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना गमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे. तिसरा सामना 11 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता दिल्लीत खेळला जाणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतीय प्लेईंग 11 काय असेल? याबाबत अंदाज बांधले जातात. दुसऱ्या सामन्यात खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहता तिसऱ्या सामन्यात आहे तसाच संघ राहील.

तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन

  • शिखर धवन (कर्णधार)
  • शुभमन गिल
  • इशान किशन
  • श्रेयस अय्यर
  • संजु सॅमसन
  • शहबाज अहमद
  • वॉशिंग्टन सुंदर
  • शार्दुल ठाकुर
  • कुलदीप यादव
  • मोहम्मद सिराज
  • आवेश खान

T20 World Cup साठी Urvashi Rautela ऑस्ट्रेलियात! नेटकरी म्हणाले, "ऋषभ पंतचे तर..."

पहिला वनडे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 40 षटकांचा करण्यात आला होता. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररण करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने 40 षटकात 4 गडी गमवून 249 धावा केल्या आणि विजयासाठी 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ 40 षटकात 8 गडी गमवून 240 धावा करू शकला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं जोरदार कमबॅक केलं. दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकात 7 गडी गमवून 278 धावा केल्या आणि विजयासाठी 279 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 45.5 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं.